राहुल गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेसची निदर्शने

राहुल गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेसची निदर्शने

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यांच्

संजय राऊत यांचा फ्लॅट व अन्य संपत्ती ईडीकडून जप्त
चिदंबरम आणखी ४ दिवस सीबीआय कोठडीत
अनिल देशमुख यांना अटक, ईडीची कारवाई

नवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अन्य नेत्या प्रियंका गांधी होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील ईडीच्या कार्यालयात राहुल गांधी पोहचले. तेथे २० मिनिटे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांची चौकशी सुरू केली. सुमारे तीन तासानंतर राहुल गांधी १० मिनिटांसाठी जेवण करण्यासाठी ईडी कार्यालयाच्या बाहेर आले. त्यानंतर तीन वाजता ते पुन्हा ३० मिनिटांसाठी ईडीच्या कार्यालयात पोहचले. राहुल गांधी यांनी आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील कायद्यातील तरतूद ५० अंतर्गत आपला जबाब नोंदवला आहे.

राहुल गांधी यांची सोमवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या आसपास जमा झाले होते. या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह पुकारला होता. पोलिसांनी अगोदर १४४ कलम पुकारल्याने शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधीही होत्या, त्या ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या.

या प्रसंगी रस्त्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खरगे, मीनाक्षी नटराजन, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरिश रावत, जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते निदर्शने करत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडीचे कार्यालय या मार्गावर चालत जाणे पसंत केले, त्या वेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नेते होते. पण मध्येच कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर राहुल गांधी यांना गाडीतून ईडीच्या कार्यालयात जावे लागले.

सरकारचे सूडाचे राजकारण

दरम्यान संध्याकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत, भूपेश बघेल व मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकार सूडाचे राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राला कर्ज दिले त्यात काय चुकीचे केले. यंग इंडिया या कंपनीतून सोनिया गांधी व राहुल गांधी एक रुपयाही घेत नाहीत, त्याचा लाभही घेत नाहीत. हे पंतप्रधानांपासून गृहमंत्री व अन्य तपासयंत्रणांना माहिती आहे, तेव्हा राहुल गांधींना ईडीच्या कार्यालयात सकाळपासून बसवून ठेवत सरकार सूडाचे राजकारण खेळत असल्याचा आरोप या नेत्यांचा होता. देशातल्या लोकशाहीचा गळा सत्ताधारी आवळत असून विरोधी पक्षातला एखादा नेता भाजपात सामील झाल्यानंतर त्याच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले जातात, सरकारी अधिकारी दबावातून अशी कामे करत आहेत, गेल्या ८ वर्षांत भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या एकाही नेत्याविरोधात ईडीने कोणतीही कारवाई केलेली नाही, याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष वेधले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0