उत्पादन कमी झाल्याने खाद्य तेलांच्या दरात वाढ

उत्पादन कमी झाल्याने खाद्य तेलांच्या दरात वाढ

नवी दिल्लीः शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल व पाम तेलाच्या दरात गेल्या वर्षभरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे कोविड-१९ महास

राहुल गांधींची ईडीकडून चौकशी, काँग्रेसची निदर्शने
लोकशाहीचं मातेरं
डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस

नवी दिल्लीः शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल व पाम तेलाच्या दरात गेल्या वर्षभरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दर वाढण्याचे कारण म्हणजे कोविड-१९ महासाथीने उत्पादन, मजूर बळावर परिणाम झाला आहे.

पाम तेलाच्या किमती वाढण्यामागे एक कारण असे की मलेशियात पामचे उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे दर वाढले आहे. भारतात पाम तेलाचा वापर अन्न, सौंदर्यप्रसाधने व बायोफ्युएल म्हणून केला जातो व पाम तेलाचा जगाला होणारा ९० टक्के पुरवठा इंडोनेशिया व मलेशिया देशाकडून केला जातो.

निक्की आशिया नुसार इंडोनेशियातील पाम उत्पादन ११ टक्क्याने तर मलेशियातील ५ टक्क्याने कमी झाले आहे.

२०१९च्या आकडेवारीनुसार जगातल्या पाम तेलाची एकूण मागणी   भारत १९ टक्के व चीन १३ टक्के इतकी आहे. हे दोन्ही देश मलेशियातून सर्वाधिक पाम तेलाची आयात करतात. भारताची एकूण खाद्य तेलाची आयात (१० अब्ज डॉलर) १ कोटी ५० लाख टन इतकी असून त्यापैकी  ९ मेट्रीक टन पाम तेल व सोयाबिन व सूर्यफूल प्रत्येकी २.५ मेट्रीक टन मागवले जाते.

गेल्या काही दिवसांत दिल्ली व मुंबईमध्ये पाम तेलाच्या प्रती लीटर किमत १०० ते १०९ रु. इतके झाले आहेत. गेल्या वर्षी या दोन शहरांतले हे दर प्रती लीटर ८७ व ७५ रु. इतके होते.

मोहरीच्या तेलातही वाढ झाली असून दिल्लीत हा प्रतीलीटर दर १२१ रु. हून १५५ रु. तर मुंबईत १४४ रु.हून १६२ रु. झाला आहे.

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीबाबत गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत पाम तेलावरचा आयात कर कमी करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर सरकार काय पावले उचलते हे लवकरच कळेल.

कच्चे व रिफाइंड पाम तेलावर अनुक्रमे ३७.५ व ४५ टक्के आयात कर आहे. त्याचबरोबर कच्चे सोयाबीन तेल व कच्चे सूर्यफूल तेलावर ३५ टक्के आयात कर आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0