‘अल्ला हू अकबर’ ही अवमानकारक प्रतिक्रिया नव्हती’

‘अल्ला हू अकबर’ ही अवमानकारक प्रतिक्रिया नव्हती’

मंड्या, कर्नाटकः “जय श्रीरामच्या घोषणेला अल्लाहू अकबर म्हणून दिलेली घोषणा ही काही अवमान करण्यासाठी धमकीवजा प्रतिक्रिया नव्हती तर या घोषणेने मला त्या क

हिंदू देवांवर विधान केल्याप्रकरणी दलित प्राध्यापकाला जबर मारहाण
आज आणि उद्या दिल्लीत ‘अधांतर’चे प्रयोग
कोरोना काळातील खरे लढवय्ये

मंड्या, कर्नाटकः “जय श्रीरामच्या घोषणेला अल्लाहू अकबर म्हणून दिलेली घोषणा ही काही अवमान करण्यासाठी धमकीवजा प्रतिक्रिया नव्हती तर या घोषणेने मला त्या क्षणी धैर्य, सामर्थ्य मिळाले. मी त्यावेळी काही क्षण घाबरले होते. अशा कठीण प्रसंगी नाव घेतल्याने धैर्य व सामर्थ्य मिळाले”, अशी प्रतिक्रिया मुस्कान खान हिने ‘द वायर’ला दिली.

गेल्या आठवड्यात कर्नाटकात मंड्या येथील पीईएस कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स व कॉमर्समध्ये हिजाब घालून प्रवेश करणाऱ्या मुस्कान या विद्यार्थीनीला काही विद्यार्थ्यांनी हिजाब काढून वर्गात जावे असा जोरदार आग्रह धरला होता. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी मुस्कानच्या दिशेने जात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकल्यानंतर मुस्कानने ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणाही दिली होती. या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियात पसरल्याने देशभर गहजब निर्माण झाला होता. काही विद्यार्थ्यांच्या टोळक्याच्या गुंडगिरीला न घाबरता मुस्कानने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध केल्याने मुस्कानच्या धैर्याचे सर्व थरातून कौतुक झाले होते. पण काही कट्टरवाद्यांनी ‘अल्ला हू अकबर’ हे जय श्रीरामला प्रत्युत्तर असल्याचा आरोप करण्यास सुरूवात केली.

या वादावर मुस्कानने, ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्याचा माझा उद्देश समोरच्या विद्यार्थ्यांचा उपमर्द वा अपमान करण्याचा नव्हता वा ती घोषणा कट्टरतावादाची प्रतिक्रिया नव्हती तर ती घोषणा केल्याने माझ्यामध्ये धैर्य व सामर्थ्य आले अशी प्रतिक्रिया दिली.

मुस्कान ही कॉमर्स शाखेत दुसऱ्या वर्षाला असून तिला वकील व्हायचे आहे. तिचे वडील मंड्यामध्ये एक व्यायामशाळा चालवतात. आपले आई-वडील प्रेरणा असल्याचे मुस्कानचे म्हणणे आहे.

मुस्कान ही वयाच्या ७-८ वर्षांपासून हिजाब घालते. हिजाब घालणे हा कट्टरता जपण्याचा भाग नाही. मला हिजाब घालण्यासाठी कोणाचीही सक्ती नाही. तो घालणे का नाही हे माझे स्वातंत्र्य आहे. तो माझा स्वाभिमान आहे. हिजाब हा माझा प्राधान्यक्रम आहे तो घातल्यावर मला सुरक्षित वाटते असे मुस्कानने सांगितले.

आयुष्यात कठीण प्रसंगी परमेश्वराचे नाव घ्यावे त्याची प्रार्थना करावी. मी तसेच केले. त्या दिवशी मी कॉलेजमध्ये बाईकवरून गेले व बाईक लावल्यानंतर अचानक विद्यार्थ्यांचा एक समूह माझ्या दिशेने आला आणि त्यांनी हिजाब उतरवण्यास सांगितले. पहिल्यांदा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण हे विद्यार्थी माझ्या पाठोपाठ येऊ लागले व तोंडासमोर येऊन त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरूवात केली. हे विद्यार्थी सातत्याने हिजाब उतरवण्याचा आग्रह धरू लागले. पण आपण हिजाब उतरवला नाही असे मुस्कानने सांगितले.

मुस्कानने त्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार नसल्याचे सांगितले. ते माझे भाऊ आहेत, मी त्यांच्याविरोधात तसे कसे करू? ही मुले चुकीच्या मार्गाला जात आहेत पण लवकरच ती योग्य मार्गावर येतील, माझा त्यावर विश्वास असल्याचे मुस्कानने सांगितले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कर्नाटकात महाविद्यालये व शाळांमध्ये हिजाब घालून येऊ नये यासाठी हिंदू कट्टरतावादी संघटनांकडून निदर्शने सुरू आहे. यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या ६ विद्यार्थींनीना वर्गात प्रवेशास बंदी घातली. या विद्यार्थींनीनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे.

हिजाब घालणे हे आमचे धर्मस्वातंत्र्य असून वर्गात प्रवेश बंदीचा निर्णय आमच्या मूलभूत हक्कावर आक्रमण असल्याची तक्रार या मुलींनी न्यायालयात केली आहे. हे प्रकरण न्यायालयात अजून सुनावणीत आहे व त्याचा निकाल अद्याप आलेला नाही.

या घडामोडीत मंड्या येथील मुस्कान खानला कॉलेज प्रवेशास बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0