एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

मुंबईः शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना पक्षाने घेतला. शिंदेंनी बं

फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार
संघावरील बंदीशी संबंधित कागदपत्रे गायब
अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी

मुंबईः शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना पक्षाने घेतला. शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर गेले अनेक दिवस त्यांची नेतेपदावरून का हकालपट्टी केली जात नाही असा विषय चर्चेत होता. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व त्यांनी आपण शिवसेना पक्षाचे अधिकृत नेते असल्याची भूमिका घेतली. येत्या ४ जुलैला नवे सरकार विधानसभेत बहुमत चाचणीलाही सामोरे जाणार आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशीरा शिंदे यांनी पक्षविरोधात बंडखोरी केल्याचे कारण सांगण्यात आले.

या घडामोडीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर हा विषय न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. विधीमंडळात बहुसंख्य आमदारांचा शिवसेना पक्ष खरा की उद्धव ठाकरे यांच्याकडे कमी आमदार असलेला पक्ष खरा यावर न्यायालयीन लढ्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीला कुणालाही पक्षातून काढून टाकण्याचा अधिकार आहे. या कार्यकारिणीत सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी (दिवंगत), लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे नेते आहेत. त्या शिवाय अनंत गीते. चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ व एकनाथ शिंदे या चौघांना नियुक्त केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0