लखीमपुर : दुसऱ्या गाडीत काँग्रेसच्या माजी खासदाराचा भाचा

लखीमपुर : दुसऱ्या गाडीत काँग्रेसच्या माजी खासदाराचा भाचा

नवी दिल्लीः उ. प्रदेशात लखीमपुर खीरीमध्ये शेतकर्यांना चिरडणार्या घटनेसंदर्भातला आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला असून या व्हीडिओतील एका गाडीत काँग्रेसचे र

विरोधकांची राष्ट्रपतींना विनंती पण शहा कायद्यावर ठाम
महाजनादेशाचा अन्वयार्थ
‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन

नवी दिल्लीः उ. प्रदेशात लखीमपुर खीरीमध्ये शेतकर्यांना चिरडणार्या घटनेसंदर्भातला आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला असून या व्हीडिओतील एका गाडीत काँग्रेसचे राज्यसभेतील माजी सदस्य अखिलेश दास यांचा भाचा अंकित दास असल्याचे आढळून आले आहे. अखिलेश दास हे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असणार्या शेतकर्यांनी दुसर्या गाडीत अंकित दास असल्याचा दावा केला आहे. या व्हीडिओत स्पष्टपणे आंदोलक शेतकर्यांवर दोन गाड्या निर्दयपणे घालण्यात आल्याचे दिसून आले आहे. यात ४ शेतकरी मरण पावले आहेत. तर गुरुवारी लवकुश व आशीष पांडेय या दोघांना अटक करण्यात आली आहे. जी गाडी आंदोलक शेतकर्यांवर व पत्रकारावर घालण्यात आली होती, त्या गाडीत हे दोघे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नव्या व्हीडिओत आंदोलक शेतकर्यांवर दोन गाड्या गेल्यानंतर एक पोलिस जखमी अवस्थेतील एका शेतकर्याची विचारपूस करत असून जखमी झालेली व्यक्ती गाडीत अंकित दास असल्याचे सांगत असल्याचे दृश्य आहे. जखमी शेतकर्याच्या डोक्यावर जबर दुखापत झाल्याचे दिसत असून शेतकर्यांच्या अंगावरून जाणारी दुसरी गाडी फॉर्च्युनर असल्याचे दिसत आहे. या गाडीत अंकित दास व अन्य चार जण असून ही गाडी अंकित दास यांची असल्याचे पोलिसांना रजिस्ट्रेशन क्रमांकावरून कळाले आहे. हे सर्व जण लखनौतील चारबाग भागात राहात असून अंकित दास हे अकाउंट पाहतात ही माहिती मिळाली आहे.

या एकूण घटनेसंदर्भात जेवढे काही व्हीडिओ, ऑडिओ वा छायाचित्रे असतील ती पोलिसांना द्यावीत असे आवाहन लखीमपुर खीरीच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी केले आहे.

दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी आरोपी आशिष मिश्रा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आशीषचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या घरावर नोटीस लावली आहे. आशीषला शुक्रवारी १० वाजता पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात स्टेट्स रिपोर्ट मागवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0