‘लोकांना भडकवलं, देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना समज

‘लोकांना भडकवलं, देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना समज

नवी दिल्लीः मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्यावर अवमानजनक टिप्पण्णी करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शुक्रवारी सर्वो

‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’
‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा

नवी दिल्लीः मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्यावर अवमानजनक टिप्पण्णी करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांना सामोरे जावे लागले. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधान करत देशात तणाव वाढवला त्याप्रकरणी त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी असे स्पष्ट शब्दांत न्या. सूर्यकांत व न्या. जेबी पारदीवाला यांच्या पीठाने सुनावले. प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात जे वादग्रस्त विधान नुपूर शर्मा यांनी केले त्यांनी देशात हिंसाचार उत्पन्न झाला त्याला त्याच सर्वस्वी जबाबदार असून त्यांनी देशाची माफी मागावी असे न्या. सूर्यकांत यांनी सुनावले. देशात आज जे काही सुरू आहे, त्यालाही हीच महिलाच एकटी जबाबदार आहे, त्यांनी व त्यांच्या वक्तव्यांनी देशात आग लागली. उदयपूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याला नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान कारणीभूत असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात केलेली अवमानजक टिप्पण्णी एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चेत केली. या निवेदकाने शर्मा यांना उद्युक्त केले. तरीही स्वतः वकील असूनही नुपूर शर्मा यांनी विधान करणे हे लांच्छनास्पद आहे, त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

टीव्हीवर ज्ञानवापी मशिदी या विषयावर चर्चा सुरू होती. हा विषय न्यायप्रविष्ट असताना तो टीव्हीवर चर्चेत कसा आला. असे विषय चर्चेला घेऊन एका अजेंड्याला पुढे करायचे हे प्रयत्न आहेत का असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

यावेळी नुपूर शर्मा यांच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले की, एकाच गुन्ह्यसाठी अनेक फिर्यादी दाखल केल्या जाऊ शकत नाही. वकिलांनी त्या पुरावा म्हणून पत्रकार अर्णव गोस्वामी व टीटी अँटोनी या खटल्याचा संदर्भ दिला. ही चर्चा कोणत्या उद्देशाने केलेली नव्हती. चर्चेत प्रतिस्पर्धी वक्त्याकडून ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडलेले शिवलिंग हे फवारा असल्याचे सातत्याने सांगितले होते. हे टीव्ही निवेदकाने म्हटले नव्हते. असे जर चालू राहिले तर कोणत्याही नागरिकाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही. यावर न्या. सूर्यकांत यांनी लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत गवत उगवू शकते तसे ते गवत गाढव खाऊही शकते. तो त्यांना अधिकार आहे, असे सांगितले.

न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. नुपूर शर्मा यांच्या तक्रारीनंतर एका व्यक्तीला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले पण नुपूर शर्मा यांच्याविरोधात फिर्याद दाखल करूनही त्यांना दिल्ली पोलिसांनी पकडले नाही, याकडे लक्ष वेधले.

न्यायालयाने पुढे नुपूर शर्मा यांच्या याचिकेवरही मत व्यक्त करताना त्यांच्या याचिकेतून अहंकार दिसत असल्याचे म्हटले. एखाद्या पक्षाचे प्रवक्ते बनल्याने कोणताही स्वैर विधाने करण्याचा परवाना आपल्याला दिला जात नाही, आपल्याविरोधात फिर्याद दाखल होऊनही अटक झालेली नाही. यातून आपल्या मागे सत्तेचे पाठबळ असल्याचे दिसून येते, असे सुनावले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0