एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चर्चा

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा संपर्क होत नसल्याने आणि ते सूरतमध्ये एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये असल्याचे वृत्त आल्याने, त्यांनी बंड केल्याची

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा घटनापीठाकडे
दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत
शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा संपर्क होत नसल्याने आणि ते सूरतमध्ये एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये असल्याचे वृत्त आल्याने, त्यांनी बंड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील नेते एकनाथ शिंदे हे काल रात्रीपासून गुजरातमध्ये सूरत येथे एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह असल्याची चर्चा आज सकाळी वृत वाहिन्यांनी सुरू केली.

शिंदे यांच्या बरोबर ११ ते ३५ आमदार असल्याची चर्चा विविध वृत्त वाहिन्यांनी सुरू केली आहे. त्याबद्दलचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच शिंदे सूरतमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचेही वृत्त आहे. त्यानंतरच आमदारांची संख्या स्पष्ट होऊ शकेल.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याचे काल स्पष्ट झाल्यानंतर शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान मुंबईमध्ये कॉँग्रेस आमदारांची बैठक कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांनी बोलावली आहे.

तर दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची चर्चा सुरू झाली असून, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी नढढा, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस उपासतहीत असल्याचे समजते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धोका नसल्याचे आणि आपण शिवसेनेबरोबर असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0