जालंधरः केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाबात घेतल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका आता १४ फेब्रुवारी २०२२ ऐवजी २
जालंधरः केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाबात घेतल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका आता १४ फेब्रुवारी २०२२ ऐवजी २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेतल्या जाणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. या पत्रात त्यांनी संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्ताने पंजाबमधील अनु. जाती, जमातीचे लाखो भाविक उत्तर प्रदेशात बनारसला भेट देत असतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. संत रोहिदास यांच्या जयंतीचा सोहळा बनारसमध्ये १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होत असल्याने पंजाबमधून सुमारे २० लाख भाविक उ. प्रदेशात जाणार आहेत. या दरम्यान पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे. पंजाबमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३८ टक्के लोकसंख्या दलित असून हा मतदार मतदानापासून दूर राहील, अशी भीती चन्नी यांनी पत्रात व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख ढकलण्याचा निर्णय घेतला.
चन्नी यांच्या खेरीज श्री गुरू रविदास जनम आस्थान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवणाऱ्या डेरा सचखंडने मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती.
मूळ वृत्त
COMMENTS