उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा

नवी दिल्लीः उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे सोपवला आहे. रावत यांच्या जागी नवा

भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले
पुष्कर सिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
कार्यकर्त्यांच्या राज्यशासनाला सूचना

नवी दिल्लीः उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे सोपवला आहे. रावत यांच्या जागी नवा नेता आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू होते. त्यांना गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते. गेले दोन दिवस रावत यांनी दिल्लीत भाजपच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या. यात नड्डा व अमित शहा हे प्रमुख नेते होते.

नड्डा यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे १० मार्चला घेतली होती व राज्य घटनेनुसार त्यांना सहा महिन्यात विधानसभा वा विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येणे बंधनकारक आहे. पण उत्तराखंडमध्ये विधान परिषद अस्तित्वात नसल्याने त्यांचा एक मार्ग बंद आहे. पण विधान सभेवर निवडून येण्यासाठी निवडणूक आयोगाने पोट निवडणुकांची घोषणा करणे गरजेचे आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीत निवडणूक आयोग पोट निवडणुका घेण्याची शक्यता मावळल्याने रावत यांना राजीनामा द्यावा लागला.

रावत यांचे मुख्यमंत्रीपद जाण्यामागे मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय व उत्तराखंड न्यायालयाचे कोविड परिस्थिती हाताळण्यावरून उत्तराखंड सरकारवर मारलेले ताशेरेही कारणीभूत ठरले आहेत. कोविडच्या दुसर्या लाटेत रावत यांनी कुंभमेळा भरवल्याने उच्च न्यायालयाने रावत सरकारवर गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेवला होता. तसेच कुंभमेळ्यात बनावट कोरोना चाचण्यांचे प्रकरणही उघडकीस आले होते. अशा परिस्थितीत भाजप अडचणीत आला होता. राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. अद्याप भाजपकडे ९ महिने शिल्लक असून या काळात ते नवे नेतृत्व देऊ शकतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0