बिहार : २७९ कोटींच्या इलेक्टोरल बाँडची विक्री

बिहार : २७९ कोटींच्या इलेक्टोरल बाँडची विक्री

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला होता. या पैशाचे स्रोत शोधण्यासाठी दाखल केलेल्या माहिती अधिकार अ

बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट
मोफत कोरोना लस: जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला होता. या पैशाचे स्रोत शोधण्यासाठी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात १९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीत बिहार निवडणुकांसाठी प्रत्येकी १ कोटी रु. रकमेचे २७९ इलेक्टोरल बाँड विकण्यात आले. या बाँडमधील १३० बाँड देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विकले गेले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी पाठवण्यात आले होते. हा धागा महत्त्वाचा आहे.

इलेक्टोरल बाँडच्या पारदर्शीपणाबद्दल यापूर्वी अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. या माध्यमातून काळा पैसा निवडणुकांत वापरण्याचा मार्ग झाल्याचा आरोप आहे. पण सरकारने त्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. २ जानेवारी २०१८मध्ये सरकारने देशातील कोणीही नागरिक वा देशातील कोणतीही कंपनी, ट्रस्ट इलेक्टोरल बाँड विकत घेऊ शकते असा कायदा केला होता. राजकीय पक्षांना पैसा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला होता व त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा १९५१मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. पण इलेक्टोरल बाँड कुणी विकले याची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवली जाते.

इलेक्टोरल बाँडचा फायदा भाजपलाच

गेल्या वर्षभरात इलेक्टोरल बाँडच्या आकडेवारी पाहता असे दिसते की देशातील सर्व राजकीय पक्षांनी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून ६ हजार कोटी रु. उभे केले आहेत व त्याचा सर्वाधिक फायदा भाजपने घेतला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने २,४१० कोटी रु. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळवले होते व ही रक्कम सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण रकमेपैकी ९५ टक्के होती.

इलेक्टोरल बाँड देण्याचा अधिकार फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाला देण्यात आला असून ही बँक या बाँडच्या विक्रीसंदर्भात कोणाचेही नाव जाहीर करत नाही.

बिहारमध्ये प्रत्येकी १ कोटी रु.च्या २७९ इलेक्टोरल बाँडची विक्री

नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत किती इलेक्टोरल बाँडची विक्री झाली याची माहिती निवृत्त कमोडोर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकार अर्जातून मिळवली. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रत्येक शाखेतून किती इलेक्टोरल बाँड विकले गेले याची माहिती मिळवली.

त्यानुसार एसबीआयने २८२.२९ कोटी रु.चे प्रत्येकी १ कोटी रु. व त्याहून अधिक रकमेचे २७९ इलेक्टोरल बाँड ऑक्टोबर १९ ते २८ दरम्यान विकले. त्यातील १३० बाँड मुंबईतून, चेन्नईतून ६०, कोलकाता येथून ३५, हैदराबादमधून २०, भुवनेश्वरमधून १७ व नवी दिल्लीच्या एसबीआय शाखेतून ११ विकले गेले.

या व्यतिरिक्त प्रत्येकी १० लाख रु. किमतीचे ३२ बाँड चार शहरांतून विकले गेले. कोलकाता येथून १०, पटना येथून ८, नवी दिल्लीतून ९, गांधी नगर येथून ५ विकले गेले. तर प्रत्येकी १ लाख रु.चे ९ बाँड दिल्लीच्या एसबीआय मुख्य शाखेतून विकले गेले. १ हजार रु.चा एक बाँडही नवी दिल्लीतून विकला गेला.

बाँडची पुनर्विक्री हैदराबाद, चेन्नई, भुवनेश्वरातून अधिक

बात्रा यांना मिळालेल्या माहिती नुसार १ कोटी रु. अधिक रकमेच्या बाँडची पुनर्विक्री हैदराबाद (९०), चेन्नई (८०), भुवनेश्वर (६७), नवी दिल्ली (२५), कोलकाता (१५) व पटना (२) येथे झाली. तर १० लाख रु.च्या बाँडची पुनर्विक्री नवी दिल्ली (१८), कोलकाता (१०), पटना (४) व प्रत्येकी १ लाख रु.च्या ९ बाँडची पुनर्विक्री नवी दिल्लीत करण्यात आली.

१ हजार रु.च्या बाँडच्या पुनविक्री न होता ते पैसे थेट पंतप्रधान राष्ट्रीय कोषात जमा १२ नोव्हेंबरला जमा झाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0