‘न्यूजक्लिक’च्या कार्यालयावर ईडीचे छापे

‘न्यूजक्लिक’च्या कार्यालयावर ईडीचे छापे

नवी दिल्लीः परदेशातून आर्थिक गुंतवणूक होत असल्याच्या संशयावरून ईडीने मंगळवारी न्यूजक्लिक डॉट इन या वेबपोर्टलच्या दिल्लीतील कार्यालयावर व या पोर्टलशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. दक्षिण दिल्लीत सैयद उल अजाब या भागात न्यूजक्लिकचे कार्यालय आहे. या न्यूज पोर्टलचे मालक प्रबीर पुरकायस्थ व संपादक प्रांजल यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत.

आपले छापे मनी लाँडरिंगसंबंधी असून परदेशातील काही संस्थांकडून न्यूजक्लिकला अवैध मार्गाने आर्थिक मदत होत असल्याच्या संशयावरून हे छापे टाकल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

या छाप्यासंदर्भात प्रांजल यांनी आम्हाला ईडीने नोटीस दिल्याचे सांगत सकाळपासून काही घरांवर ईडीकडून तपास केला जात आहे. त्यांना संपूर्णपणे सहकार्य दिले जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

न्यूजक्लिकसाठी यूट्यूबवर अभिसार शर्मा हे आपले कार्यक्रम करत असतात. त्यांनीही या छाप्यांची पुष्टी केली आहे.

ईडीचे छापे पत्रकारांना धमकावण्यासाठी असून स्वतंत्र पत्रकारिता करणार्या संस्थांवर सरकार दबाव आणत असल्याचा आरोप काही पत्रकारांनी सोशल मीडियात केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS