एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप

एल्गार परिषद चौकशीत आता ईडी; गडलिंग यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप

मुंबईः एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र गडलिंग यांची चौकशी करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयाला गुरुवारी केली. ही चौकश

विचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
सुधा भारद्वाज यांना जामीन
भीमा कोरेगाव हॅकींग प्रकरणात पोलिसाचे नाव उघड

मुंबईः एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र गडलिंग यांची चौकशी करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयाला गुरुवारी केली. ही चौकशी गडलिंग यांच्याविरोधात २०२१ मध्ये ईडीने दाखल केलेल्या एका फिर्यादीबाबत (ईसीआयआर) आहे.

सुरेंद्र गडलिंग चार वर्षे तळोजा कारागृहात तुरुंगात आहेत व आता त्यांची मनी लाँड्रिंग अंतर्गत चौकशी होणार आहे.

गडलिंग हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी गट) चालवण्यासाठी आर्थिक निधी गोळा करत होते असे ईडीचे म्हणणे आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे आयोजित एल्गार परिषद भरवण्यात गडलिंग यांचा सहभाग होता. ही परिषद नक्षलवादी कारवायांचा एक भाग असून शहरात नक्षलवाद पसरवण्यासाठी हे प्रयत्न होते, असे ईडीचे म्हणणे आहे. गडलिंग यांनी काही दहशतवादी संघटना व भाकपा (माओवादी)च्या प्रसारासाठी आर्थिक निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यात गडलिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व जण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी खोट्या नावाचे ईमेल व सीम कार्डचा वापर करत होते, असे ईडीचे म्हणणे आहे.

गडलिंग यांचा जबाब मिळावा म्हणून ईडी प्रयत्न करत असून त्यांचा १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या काळात जबाब मिळावा असे प्रयत्न सुरू आहेत. पण ईडीच्या विनंतीवर अजून न्यायालयाने निर्णय घेतलेला नाही. तो १० ऑगस्ट पर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे.

ईडीने एल्गार परिषद प्रकरण आता या घटनेशी जोडले आहे. एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0