स्टॉकहोम : २०१९चा प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शुक्रवारी जाहीर झाला. १९९८ ते २००० या दरम्यान इरिट्रिया व
स्टॉकहोम : २०१९चा प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शुक्रवारी जाहीर झाला.
१९९८ ते २००० या दरम्यान इरिट्रिया व इथिओपिया या दोन देशांमध्ये युद्ध झाले होते. त्यात मोठ्या प्रमाणात मानवी संहार झाला होता. युद्ध संपूनही गेली १८ वर्षे दोघांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. पण २०१८ मध्ये अबी अहमद यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी इरिट्रियाशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली व त्यातून उभय देशांमध्ये शांतता व मैत्रीचा करार झाला. असा करार करण्यामागे अबी अहमद यांचे मोठे योगदान होते त्यामुळे त्यांची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
या पुरस्काराची रक्कम सुमारे ९ लाख १२ हजार डॉलर इतकी आहे. या आठवड्यात जीव, रसायन, भौतिक, साहित्य व शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पुञील आठवड्यात अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. तर १० डिसेंबरला नोबेल पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
मूळ बातमी
COMMENTS