‘९ मे रोजी रशिया युक्रेनशी युद्धाची घोषणा करेल’

‘९ मे रोजी रशिया युक्रेनशी युद्धाची घोषणा करेल’

येत्या ९ मे अखेर रशिया युक्रेनविरोधात अधिकृतपणे युद्ध पुकारेल अमेरिका व पाश्चिमात्य देशातील अधिकाऱ्यांचे मत आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या फौजा घुसल्या अ

शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप
प. बंगालमधील मतांसाठी मोदींचा बांग्लादेश दौरा
‘काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही’

येत्या ९ मे अखेर रशिया युक्रेनविरोधात अधिकृतपणे युद्ध पुकारेल अमेरिका व पाश्चिमात्य देशातील अधिकाऱ्यांचे मत आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या फौजा घुसल्या असल्या तरी युक्रेनचा पाडाव झालेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सैन्य दल घुसवण्याचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा प्रयत्न असेल असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

९ मे ही तारीख मुक्रर करण्यामागे रशियाचा आंतरराष्ट्रीय समुदायाला एक संदेश देण्याचा  प्रयत्न आहे. कारण ९ मे १९४५ साली रशियाच्या सैन्याने नाझी फौजांचा पराभव केला होता, या विजयाचे प्रतीक म्हणून व आपल्या प्रचाराचा एक भाग म्हणून पुतीन हे पाऊल उचलतील अशी शक्यता आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची अधिकृत घोषणा केल्यास त्यांच्या लष्कराला रशियाच्या कायद्यानुसार पूर्ण लष्करी सामर्थ्य वापरण्याचे अधिकार मिळतील. सध्या युक्रेनमध्ये रशियाचे किती सैनिक कार्यरत आहेत, याचा आकडा जाहीर झाला नसला तरी त्यांचे १० हजाराहून अधिक सैनिक ठार झाल्याचे पाश्चिमात्य प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे.

युक्रेनमध्ये रशियाने आपले सैन्य घुसवले असले तरी पुतीन यांनी या आक्रमणाला लष्करी कारवाई असे संबोधले आहे. रशियाने युद्ध व लष्करी कारवाई या संकल्पनेत भेद करत युक्रेनवर हल्ले चालूच ठेवले आहेत. पण ९ मे नंतर रशिया मोठ्या ताकदीने युक्रेनवर आक्रमण करेल असे ब्रिटनचे संरक्षण सचिव बेल वॉलेस यांनी गेल्या आठवड्यात एलबीसी रेडिओला सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0