१०६ माजी सनदी अधिकाऱ्यांचा CAA, NRC, NPRला विरोध

१०६ माजी सनदी अधिकाऱ्यांचा CAA, NRC, NPRला विरोध

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी व एनपीआर हे सरकारी तिजोरीवर अनावश्यक आर्थिक बोजा असून ही मोहीमच व्यर्थ असून त्याने जनतेला अनेक समस्यांना

भटके विमुक्त आणि सीएए
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल
मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी व एनपीआर हे सरकारी तिजोरीवर अनावश्यक आर्थिक बोजा असून ही मोहीमच व्यर्थ असून त्याने जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे सरकारने ते रद्द करावे अशी विनंती करणारे पत्र देशातील १०६ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे.

या पत्राच्या मथळ्यातच भारताला सीएए-एनपीआर-एआरसीची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे देशातील एका मोठ्या लोकसंख्या वर्गात याविषयी शंका उत्पन्न झाली आहे व मुस्लिमांना यातून मुद्दामून वगळण्यात आल्याने या शंकेला अधिक वाव मिळाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २२ डिसेंबरच्या भाषणात सीएए व एनआरसीची चर्चा झालीच नसल्याचे विधान केले होते व गृहमंत्र्यांचे विधान त्याच्या विपरित होते. अशा वेळी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे. अशा मोहिमेवरचा प्रचंड आर्थिक ताण तिजोरीवर अनावश्यक आहे, असे या माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या पत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्या अधिकाऱ्यांची नावे..

अनिता अग्निहोत्री, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, सामाजिक न्याय अधिकार विभाग, भारत सरकार.

सलाहुद्दीन अहमदियास (सेवानिवृत्त), माजी मुख्य सचिव, राजस्थान सरकार

व्ही.एस. ऐलावाडी, आयएएस (सेवानिवृत्त) माजी उपाध्यक्ष, दिल्ली विकास प्राधिकरण.

एस. एम्ब्रोज, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त सचिव, जहाजबांधणी व वाहतूक मंत्रालय, भारत सरकार.

आनंद आर्णी आरअँण्डडब्ल्यू (सेवानिवृत्त) माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय, भारत सरकार.

मोहिंदरपाल ओलाख, (आयपीएस सेवानिवृत्त) माजी पोलिस महासंचालक (कारागृह), पंजाब सरकार.

एन. बाला भास्कर आयएएस (सेवानिवृत्त) माजी प्रधान सल्लागार (वित्त), विदेश मंत्रालय, भारत सरकार.

वपला बालाचंद्रम् (आयपीएससेवानिवृत्त) माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय, भारत सरकार.

गोपालन बालागोपाल (सेवानिवृत्त) माजी विशेष सचिव, पश्चिम बंगाल.

चंद्रशेखर बालाकृष्णनन (सेवानिवृत्त) माजी सचिव, कोळसा, भारत सरकार

शरद बेहार आयएएस (सेवानिवृत्त) माजी मुख्य सचिव, मध्य प्रदेश.

मधु भादुरी आयएफएस (सेवानिवृत्त) पोर्तुगालचे माजी राजदूत.

मीरा सी बोरवणकर (सेवानिवृत्त) माजी डीजीपी, ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट.

रवी बुधीराजा आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट.

सुंदर बुर्रा आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, शासन. महाराष्ट्र.

आर. चंद्रमोहन (सेवानिवृत्त) माजी प्रधान सचिव, परिवहन व नागरी विकास, दिल्ली.

के.एम.चंद्रशेखर (सेवानिवृत्त) माजी कॅबिनेट सचिव, भारत सरकार.

रचेल चटर्जी आयएएस (सेवानिवृत्त) माजी विशेष मुख्य सचिव, कृषी, सरकार. आंध्र प्रदेश.

कल्याणी चौधुरी आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, प. बंगाल.

अण्णा दानी आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव,  महाराष्ट्र.

सुरजित के. दास आयएएस (सेवानिवृत्त) माजी मुख्य सचिव, उत्तराखंड.

विभा पुरी दास आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, आदिवासी कार्य मंत्रालय, भारत सरकार.

पी.आर. दासगुप्ता आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, भारतीय खाद्य महामंडळ, भारत सरकार.

नरेश्वर दयाल (सेवानिवृत्त) माजी सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ब्रिटनचे उच्चायुक्त.

प्रदीप के. डेब आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, क्रीडा विभाग.

नितीन देसाई आयईएस (सेवानिवृत्त) माजी सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार, वित्त मंत्रालय, भारत सरकार. केशव देसिराजू आयएएस (सेवानिवृत्त) माजी आरोग्य सचिव, भारत सरकार. एम.जी.देवासाहयम, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, हरियाणा. सुशील दुबे, आयएफएस (सेवानिवृत्त) स्वीडनमधील माजी राजदूत. के.पी. फॅबियन, आयएफएस (सेवानिवृत्त) इटलीमधील माजी राजदूत. प्रभु घाटे आयएएस (सेवानिवृत्त) माजी महासंचालक, पर्यटन विभाग. आरिफ गौरी. आयआरएस (सेवानिवृत्त) माजी शासन सल्लागार, डीएफआयडी, ब्रिटनमध्ये प्रतिनियुक्तीवर. गौरीशंकर घोष (सेवानिवृत्त) माजी मिशन संचालक, राष्ट्रीय पेयजल मिशन. एस.के. गुहा आयएएस (सेवानिवृत्त) माजी सहसचिव, महिला व बाल विकास विभाग. मीना गुप्ता, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार. रवी वीरा गुप्ता (सेवानिवृत्त) माजी नायब राज्यपाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. वजाहत हबीबुल्लाह, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, भारत सरकार आणि मुख्य माहिती कमिशनर. दीपा हरी, आयआरएस (राजीनामा). सज्जाद हसन, आयएएस (सेवानिवृत्त) माजी आयुक्त (नियोजन), मणिपूर. सिराज हुसेन, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, कृषी विभाग, भारत सरकार. कमल जसवाल, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार. जगदीश जोशी, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन), महाराष्ट्र.  नजीब जंग, आयएएस (सेवानिवृत्त) माजी लेफ्टनंट गव्हर्नर, दिल्ली. राहुल खुल्लर, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण. के. जॉन कोशी, आयएएस (सेवानिवृत्त) माजी राज्य मुख्य माहिती आयुक्त, प. बंगाल.

 

अजय कुमार, आयएफओएस (सेवानिवृत्त) माजी संचालक, कृषी मंत्रालय, भारत सरकार. अरुण कुमार, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी.  बृजेश कुमार, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग. पी. के. लाहिरी आयएएस (सेवानिवृत्त) माजी कार्यकारी संचालक, आशियाई विकास बँक. सुबोध लाल, आयपीओएस (राजीनामा) माजी उपसंचालक, संचार मंत्रालय, भारत सरकार. एस.के. लंबा, आयएफएस (सेवानिवृत्त) भारताचे पंतप्रधान माजी खास दूत. पी.एम.एस. मलिक आयएफएस (सेवानिवृत्त) म्यानमारचे माजी राजदूत आणि विशेष सचिव, एमईए. हर्ष मंदिर आयएएस (सेवानिवृत्त) मध्य प्रदेश. ललित माथूर, आयएएस (सेवानिवृत्त) माजी महासंचालक, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था, भारत सरकार. अदिती मेहता आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, राजस्थान. शिवशंकर मेनन (सेवानिवृत्त) माजी परराष्ट्र सचिव आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. सोनालीनी मिरचंदानी, आयएफएस (राजीनामा). सुनील मित्रा आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, अर्थ मंत्रालय, भारत सरकार. देब मुखर्जी, आयएफएस (सेवानिवृत्त) बांगलादेशचे माजी उच्चायुक्त आणि नेपाळचे माजी राजदूत.  शिवशंकर मुखर्जी, आयएफएस (सेवानिवृत्त) ब्रिटनचे माजी उच्चायुक्त. प्रणव एस. मुखोपाध्याय, आयएएस (सेवानिवृत्त) माजी संचालक, पोर्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. शोभा नंबिसन (सेवानिवृत्त) माजी प्रधान सचिव (नियोजन), कर्नाटक. पी.जी.जे. नामपुथिरी, आयपीएस (निवृत्त) माजी पोलिस महासंचालक, गुजरात. सुरेंद्र नाथ, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सदस्य, वित्त आयोग, मध्यप्रदेश. पी. ए. नासरेथ, आयएफएस (सेवानिवृत्त).  अमिताभ पांडे, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, आंतरराज्यीय परिषद, भारत सरकार. आलोक पेरती आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, कोळसा मंत्रालय. आर.एम.प्रेमकुमार (सेवानिवृत्त) माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र. टी.आर.रघुनंदन (सेवानिवृत्त) माजी सहसचिव, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार. एन. के. रघुपती, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, कर्मचारी निवड आयोग, भारत सरकार. व्ही.पी. राजा, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ. सी. बाबू राजीव, आयएएस (सेवानिवृत्त), माजी सचिव. के. सुजाताराव, आयएएस (सेवानिवृत्त) माजी आरोग्य सचिव. एम.वाय. राव आयएएस (सेवानिवृत्त). सतवंत रेड्डी, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, रसायने व पेट्रोकेमिकल्स. ज्युलिओ रिबेरो, आयपीएस (सेवानिवृत्त) पंजाबचे राज्यपाल व माजी राजदूत रुमानिया, माजी सल्लागार. अरुणा रॉय, आयएएस (राजीनामा). मनेंद्र एन. रॉय, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, प. बंगाल. दीपक सनन, आयएएस (सेवानिवृत्त) हिमाचल प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री यांचे माजी प्रधान सल्लागार. जी. शंकरन, आयसी अँड सीईएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क व सुवर्ण (नियंत्रण) अपीलीय न्यायाधिकरण. श्याम सरन, आयएफएस (सेवानिवृत्त) माजी परराष्ट्र सचिव व माजी अध्यक्ष, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ. एस. सत्यभामा, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अध्यक्ष, राष्ट्रीय बियाणे महामंडळ. एन.सी. सक्सेना, आय.ए.एस. (सेवानिवृत्त) माजी सचिव, नियोजन आयोग, भारत सरकार. अर्धेंदू सेन, आयएएस (सेवानिवृत्त) माजी मुख्य सचिव, पश्चिम बंगाल.  अभिजीत सेन गुप्ता (सेवानिवृत्त) माजी सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार. आफताब सेठ, आयएफएस (सेवानिवृत्त) जपानमधील माजी राजदूत. अशोक कुमार शर्मा (सेवानिवृत्त) फिनलँड आणि एस्टोनियामधील माजी राजदूत. नवरेखा शर्मा (सेवानिवृत्त) इंडोनेशियातील माजी राजदूत. प्रवेश शर्मा, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, मध्यप्रदेश. राजू शर्मा, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सदस्य, महसूल मंडळ, उत्तरप्रदेश.  रश्मी शुक्ला शर्मा (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, मध्यप्रदेश.  हर मंदर सिंह, (सेवानिवृत्त) माजी महासंचालक, ईएसआय कॉर्पोरेशन. पदमवीर सिंग आयएएस (सेवानिवृत्त) माजी संचालक, एलबीएसएनएए, मसूरी. सत्यवीरसिंग, आयआरएस (निवृत्त) माजी आयकर आयुक्त, भारत सरकार. सुजाता सिंह, आयएफएस (सेवानिवृत्त) माजी परराष्ट्र सचिव, भारत सरकार. त्रिलोचन सिंग, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, भारत सरकार. जवाहर सीरकर आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि माजी सीईओ, प्रसार भारती. नरेंद्र सिसोदिया,आयएएस (सेवानिवृत्त) माजी सचिव, अर्थ मंत्रालय. मनोज श्रीवास्तव, आयएएस (सेवानिवृत्त) माजी आयुक्त, विभागीय चौकशी (मुख्य सचिव पद). संजीवीनी सुंदर, आयएएस (सेवानिवृत्त) परिवहन मंत्रालय, माजी सचिव. परवीन ताल्हा आयआरएस (सेवानिवृत्त) माजी सदस्य, केंद्रीय लोकसेवा आयोग. थँकेसे थेकेकेरा, आयएएस (सेवानिवृत्त) माजी अतिरिक्त मुख्य सचिव, अल्पसंख्यांक विकास, महाराष्ट्र. पी. एस.एस. थॉमस, आयएएस (सेवानिवृत्त) माजी सरचिटणीस सरचिटणीस, राष्ट्रीय मानवाधिकार समिती. गीता थोपल, आयआरएएस (सेवानिवृत्त) माजी महाव्यवस्थापक, मेट्रो रेल्वे, कोलकाता. हिंदल तैयबजी, आयएएस (सेवानिवृत्त) माजी मुख्य सचिव पद, जम्मू आणि काश्मीर. रमणी वेंकटेशन (सेवानिवृत्त) माजी महासंचालक, यशदा, शासन. महाराष्ट्र.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: