बिहार एक्झिट पोलः महागठबंधनाला कौल

बिहार एक्झिट पोलः महागठबंधनाला कौल

देशातल्या बहुतांश सर्वच सर्वेक्षण चाचण्यांमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होऊन राजद-काँग्रेसप्रणित महागठबंधनचे सरकार येईल असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. या

नितीशकुमार दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी उपमुख्यमंत्री
मोदींच्या वाढदिवसाला बिहार सरकारचा डेटामध्ये फेरफार
या कारणांमुळे ठरली बिहारची निवडणूक वैशिष्टयपूर्ण

देशातल्या बहुतांश सर्वच सर्वेक्षण चाचण्यांमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होऊन राजद-काँग्रेसप्रणित महागठबंधनचे सरकार येईल असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. या सर्व सर्वेक्षण चाचण्यांची सरासरी केल्यानंतर महागठबंधनला १२२ जागा तर एनडीएला ५५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘चाणक्य’ने बिहार विधानसभेतील एकूण २४३ जागांपैकी राजद-काँग्रेसला १८० जागा मिळतील व बहुमताचे सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे.

टाइम्स नाऊ सी-व्होटरने महागठबंधनला १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. यात राजदला ८५ तर काँग्रेसला २५ जागा मिळतील असे सांगितले आहे. तर एनडीए आघाडीला ११६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला १ जागा मिळेल असे सांगितले आहे.

रिपब्लिक टीव्ही-जन की बात सर्वेक्षणाने महागठबंधनला ११८ ते १३८ जागा, एनडीए आघाडीला ९१ ते ११७ व लोजपाला ५ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

रिपब्लिक टीव्हीने राजदला ७९-९१ तर काँग्रेसला २४-३० तर डाव्यांना १५-१७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

भाजपला ६०-७५, जेडीयूला ३१-४२ जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी-सीव्होटर सर्वेक्षणात महागठबंधनला १०८-१३१ तर एनडीएला १०४-१२८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असून राजदला सर्वाधिक जागा मिळतील असेही सांगण्यात आले आहे.

टीव्ही-9 भारतवर्ष सर्वेक्षणाने महागठबंधनला ११५-१२५ व एनडीएला ११०-१२० इतक्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: