भूपेंद्र सिंह मान यांचा समितीचा राजीनामा

भूपेंद्र सिंह मान यांचा समितीचा राजीनामा

नवी दिल्लीः भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या कृषी समितीच्या  सदस्यपदाचा गुरुवारी अचानक राजीनामा दि

कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीःशेतकऱ्यांचे मोदींना पत्र
शेती कायद्यावर सरकार मवाळ, पण पेच कायमच
शेतकरी संघटना-सरकारची ४ जानेवारीला पुन्हा बैठक

नवी दिल्लीः भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या कृषी समितीच्या  सदस्यपदाचा गुरुवारी अचानक राजीनामा दिला. शेतकर्यांच्या हिताविरोधात आपण जाऊ शकत नाही, आपण स्वतः शेतकरी व एका संघटनेचे नेते असल्याने आम जनता व शेतकरी संघटना यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाकुशंकामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी प्रसिद्ध केलेले पत्र.

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह मान यांनी प्रसिद्ध केलेले पत्र.

त्यांनी एक पत्र प्रसिद्ध केले. पंजाब व देश यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत व पंजाबमधील शेतकर्यांच्या बाजूने आपण कायम उभे राहू असेही ते म्हणाले आहेत.

मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार कृषी तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीत भूपेंद्र सिंह मान यांचा समावेश होता. या समितीत शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, प्रमोद कुमार जोशी व अशोक गुलाटी असे अन्य सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शेती कायद्याच्या बाजूचे असल्याने या समितीच्या अस्तित्वावर चोहोबाजूंनी टीका झाली.

या समितीशी कोणतीही चर्चा करणार नाही, असा पवित्राही शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतल्याने पेच कायम राहिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0