शेतकरी संघटनांकडून २६ मार्चला भारत बंद

शेतकरी संघटनांकडून २६ मार्चला भारत बंद

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध व दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला ४ महिने होत असल्याच्या

मोफत मेट्रो-बससेवा
शेतकरी मागण्यांवर ठाम, आंदोलन चिघळले
एनआयएचा हस्तक्षेप : राजकीय कुरघोडी

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध व दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला ४ महिने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्चला देशातील शेतकरी संघटना व कामगार संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये शेतकरी संघटना व कामगार संघटना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, रेल्वेचे खासगीकरण याविरोधातही सरकारच्या विरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती शेतकरी नेते बुटा सिंह बुर्जनिल यांनी बुधवारी दिली. २६ मार्चला देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ही आंदोलने केली जातील, जिल्हाधिकार्यांना डिझेल-पेट्रोल-एलपीजीच्या वाढत्या दरांबाबत एक निवेदन जाईल तसेच रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात प्रत्येक रेल्वे स्थानकांवर निदर्शने केली जातील, असे बुर्जनिल यांनी सांगितले.

२६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला ४ महिने पूर्ण होत असून त्या दिवशी आमचे बंदचे आवाहन आहे. हा बंद शांततामय व तो सकाळ ते संध्याकाळ असेल असेही बुर्जनिल यांनी सांगितले.

काही अन्य आंदोलनांचीही घोषणा

२६ मार्चच्या भारत बंद आधी १९ मार्चला मंडया वाचवा, शेती वाचवा असेही आंदोलन केले जाणार आहे.

त्याच बरोबर भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांचा हुतात्मा दिन साजरा केला जाईल. या वेळी देशातील तरुण दिल्लीच्या वेशींवर सरकारविरोधात निदर्शने करणार आहेत. त्याच बरोबर २८ मार्चला होळीच्या दिवशी शेती कायद्यांची होळी करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0