रिलायन्स जिओची ‘ट्राय’कडे धाव

रिलायन्स जिओची ‘ट्राय’कडे धाव

नवी दिल्लीः मोबाइल सेवा देणार्या देशातील दोन प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल व वोडाफोन आयडिया लि. आपल्या कंपनीच्या विरोधात विद्वेषपूर्ण व नकारात्मक

कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व
‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
बिहारः एनडीएचा पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा

नवी दिल्लीः मोबाइल सेवा देणार्या देशातील दोन प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल व वोडाफोन आयडिया लि. आपल्या कंपनीच्या विरोधात विद्वेषपूर्ण व नकारात्मक प्रचार करत असल्याचा थेट आरोप रिलायन्स जिओ कंपनीने भारत दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पत्र लिहून केला आहे. हे पत्र २० नोव्हेंबर २०२०मध्ये लिहिले असून एअरटेल, वोडाफोन-आयडियाने सुरू केलेले हे बाजारयुद्ध अनैतिक, स्पर्धेच्या विपरित असल्याचा जिओचा आरोप आहे. जिओने पंजाब व उत्तर भारतातील राज्यांमध्ये कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या प्रचाराचे छायाचित्रही पत्रासोबत पाठवले आहेत.

अशा नकारात्मक प्रचाराच्याद्वारे आपल्या कंपनीचे लाखो मोबाइल ग्राहक या दोन कंपन्या घेत असून जिओच्या मोबाइल ग्राहकांनी भारती एअरटेल व वोडाफोन आयडियाची सेवा घेतल्यास तशी सेवा घेणे म्हणजे त्या ग्राहकाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे, असा समज या कंपन्या पसरवत असल्याचा आरोपही जिओने केला आहे. या दोन कंपन्यांच्या अशा प्रकाराने आपल्या कंपन्यांच्या कर्मचार्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता जिओने ट्रायला लिहिलेल्या पत्रात नमूद केली आहे.

पंजाब व हरयाणातल्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्याचा आधार घेत सरकारचे तीन शेती कायदे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमुहाला फायदे देणारे आहेत, या कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकरी रसातळाला जाणार असून रिलायन्स कंपनी नफा कमावणार आहे, अशा अफवा एअरटेल, वोडाफोन-आयडिया कंपन्यांकडून पद्धतशीर पसरवल्या जात आहेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले.

यापूर्वी एअरटेल, वोडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या मोबाइल क्रमांक स्थानांतर मोहिमेवरही या पूर्वी जिओने ट्रायला पत्र लिहून आक्षेप घेतले होते.

एअरटेल, वोडाफोन-आयडियाने आरोप फेटाळले

दरम्यान जिओ कंपनीने केलेले सर्व आरोप आधारहीन असल्याचे एअरटेल व वोडाफोन-आयडियाने स्पष्ट केले आहे. भारती एअरटेलने ट्रायला लिहिलेल्या पत्रात आमच्या कंपनीचे प्रतिस्पर्धी कोणत्याही थरावर जाऊ शकतात याचे हे उदाहरण आहे. आमचे व्यवहार पारदर्शक असून ग्राहकांचा आमच्यावर विश्वास असल्याने ते आमची सेवा स्वीकारतात असे म्हटले आहे.

वोडाफोन-आयडियाच्या प्रवक्त्यानेही जिओचे आरोप फेटाळत आमची कंपनी पूर्णपणे पारदर्शकपणे व नैतिकता पाळून व्यवसाय करत असल्याचा दावा केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0