शेतकरी संघटनांचा ८ डिसेंबरला भारत बंद

शेतकरी संघटनांचा ८ डिसेंबरला भारत बंद

नवी दिल्लीः  केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा विरोध म्हणून येत्या ८ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. शुक्रवारी ही घ

शेती कायदाः रखवालदार म्हणून चोराची नेमणूक
शेतकरी आंदोलनः बैठक निष्फळ, ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा
कृषीकायदे खरेच शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहेत?

नवी दिल्लीः  केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा विरोध म्हणून येत्या ८ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. ८ डिसेंबरच्या दिवशी टोल नाक्यांवर आंदोलन करण्यात येईल, दिल्लीला येणारी सर्व वाहतूक रोखून धरण्यात येईल असाही इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

आज शेतकरी संघटना व सरकारची चर्चेची चौथी फेरी असून या चर्चेत सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असाही इशारा शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी दिली आहे.

भारतीय किसान युनियनचे महासचिव एच एस लाखोवाल यांनीही शेतकर्यांच्या मागण्या सरकार मान्य करत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत येत्या ५ डिसेंबरला देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्यांचे दहन केले जाणार असल्याचे सांगितले. दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते अडवून धरण्यात येतील असाही इशारा त्यांनी दिला.

ऑल इंडिया किसान सभेचे महासचिव हन्नान मोल्लाह यांनी व भारतीय किसान युनियनचे नेते राकेत टिकैट यांनीही ८ डिसेंबरला भारत बंद केला जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान शुक्रवारी आंदोलनाच्या नवव्या दिवशी नवी दिल्लीच्या सिंधू, टकरी, चिल्ला, गाजीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसानी शहरातही वाहतुकीचे मार्ग बदलले आहे. सिंधू, लम्पुर, औचंदी, साफियाबाद, पियाओ मनियारी व सबोली सीमा बंद करण्यात आली आहे.

८ पक्षांचे शेतकरी आंदोलनास पाठिंबा

शुक्रवारी देशातल्या ८ प्रमुख विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, टीएमकेचे टीआर बालू, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी, सीपीआयचे महासचिव डी राजा, राजदचे खासदार मनोज झा, सीपीआय (माले)चे महासचिव दीपांकर भट्टाचार्य, एआयएफबीचे देवव्रत बिस्वास व आरएसपीचे महासचिव मनोज भट्टाचार्य यांच्या स्वाक्षर्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: