शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल

शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल

नवी दिल्लीः तीन वादग्रस्त शेती कायदे मागे घ्यावेत म्हणून गेले तीन महिने दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. प्रजासत्ता

रिहाना, ग्रेटाचे एक ट्विट व हादरले सरकार
शेती कायदे मागे; पंजाबमध्ये काय घडू शकेल?
‘दिल्लीत बसून शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाहीत’

नवी दिल्लीः तीन वादग्रस्त शेती कायदे मागे घ्यावेत म्हणून गेले तीन महिने दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकर्यांनी काढलेली ट्रॅक्टर परेड दिल्लीच्या आत घुसली. हजारो शेतकरी व शेकडो ट्रॅक्टर सिंघु व टिकरी सीमेवरून बॅरिकेड तोडून दिल्लीत घुसले. दुपारी हजारो शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर धडक मारली. या किल्ल्याच्या परिसरात हजारो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकर्यांनी तिरंग्यानजीक आपल्या संघटनांचे झेंडेही फडकावले. शेतकर्यांची ही धडक पाहून दिल्ली पोलिसांनी आपला विरोध कमी केला आहे.

सकाळी शेतकरी दिल्लीत घुसू नये म्हणून सिंघु व टिकरी सीमेवर दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण हळूहळू शेतकर्यांची संख्या वाढत गेली. पोलिसांनी जमलेल्या शेतकर्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांवरही बेदम लाठीमार केला. पण शेतकर्यांची वाढती संख्या पाहून पोलिसांचा बंदोबस्तही कमजोर झाला. आंदोलकही मिळेल त्या रस्त्याने दिल्लीत घुसले. गाझीपूर सीमेवर शेतकर्यांनी बॅरिकेड्स तोडले. अक्षरधाम नोएडा येथे शेतकरी व पोलिसांमध्ये चकमक झाली.

तर आयटीओ भागात हजारो शेतकरी पोहचले. शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे काही आंदोलकांचे म्हणणे होते. काही शेतकरी नेत्यांनी या आंदोलनात सरकारनेच समाजकंटकांना प्रवेश देऊन हिंसाचार सुरू केल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0