पोलिसांकडून सेलेब्रिटींच्या ट्विटची चौकशी

पोलिसांकडून सेलेब्रिटींच्या ट्विटची चौकशी

नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनाला जगभरातून समर्थन मिळाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून देशातल्या सेलेब्रिटींनी सरकारच्या भूमिकेला एकसाथ समर्थन केलेल्या ट

३ शेती कायदे रद्द व्हावेतः सुप्रीम कोर्टात याचिका
शेतकरी आंदोलनः बैठक निष्फळ, ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा
शेतकरी आंदोलनः शीख धर्मगुरुची आत्महत्या

नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनाला जगभरातून समर्थन मिळाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून देशातल्या सेलेब्रिटींनी सरकारच्या भूमिकेला एकसाथ समर्थन केलेल्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या गृहखात्याने घेतला आहे. तसे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. काही सेलेब्रिटींकडून सरकार समर्थनार्थ केलेल्या ट्विटमधील मजकूर एकसारखा होता, तो का होता, याची चौकशी केली जाणार आहे.

सेलेब्रिटींनी सरकार समर्थनार्थ केलेले ट्विट भाजपच्या दादागिरीमुळे व दबावाला बळी पडून व घाबरून केले आहेत, असा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेसने केला होता. त्यानंतर हे आदेश दिले गेले आहेत.

सरकार समर्थनार्थ ट्विट केलेल्यांमध्ये भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, भारत रत्न जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल यांची नावे आहेत. या सेलेब्रिटींनी #IndiaTogether व #IndiaAgainstPropaganda अशा हॅटटॅग खाली सरकार समर्थनार्थ शेतकर्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे ट्विट केले होते.

शेतकरी आंदोलन समर्थनाची १२०० ट्विट खाती हटवण्याचे निर्देश

ट्विटरवर शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन करणारी १२०० हून अधिक खाती खलिस्तान व पाकिस्तान समर्थक असल्याचा दावा करत ती त्वरित हटवावी असे केंद्र सरकारने ट्विटरला सांगितले आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काही ट्विटला पसंत केल्यावरूनही सरकार नाराज आहे. सरकारने ट्विटरच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ट्विटरवरची १२०० अकाउंट हटवण्याचा हा निर्णय सरकार व ट्विटरदरम्यान असलेल्या तणावातून झाला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0