नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर निश्चित असा तोडगा बुधवारी निघाला नाही. पण शेतकरी स
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर निश्चित असा तोडगा बुधवारी निघाला नाही. पण शेतकरी संघटनांनी उपस्थित केलेल्या वीज कायदा व पेंढ्या जाळण्याबाबत सरकार व शेतकरी संघटनांमध्ये सहमती झाल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. तर शेतकरी नेते कलवंत सिंह संधू यांनी चर्चेची पुढची फेरी ४ जानेवारी रोजी होईल असे सांगितले. या चर्चेत किमान हमीभाव व तीन शेती कायद्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी झालेली चर्चेची ६ वी फेरी आहे.
सरकारने तीन शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण शेतकरी संघटनांनी पूर्वीच तीनही शेती कायदे रद्द करावेत असाच आग्रह धरला आहे. सरकारने तीन कायदे तयार करणे व ते रद्द करणे ही दीर्घ प्रक्रिया असल्याचा मुद्दा मांडला होता.
कृषीमंत्र्यांनी दिल्लीच्या वेशीवर ठिय्या मारून बसलेल्या शेतकरी महिला व मुलांना घरी पाठवावे अशी पुन्हा विनंती केली. आम्हाला नववर्षाचे सर्वांनी स्वागत करावे असे वाटत आहे. आंदोलकांनी सुखरूप घरी जावे, हा पेच सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, हमीभाव रद्द केला जाणार नाही असे तोमर यांनी सांगितले.
COMMENTS