धारावीतील कोरोना : भय, तडजोड, अनिश्चितता

धारावीतील कोरोना : भय, तडजोड, अनिश्चितता

मुंबईतील धारावी भागात कोरोना विषाणू बाधित १३८ रुग्ण आढळले असून या भागातील कोरोना बाधितांची संख्या वाढेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

देशव्यापी लॉकडाऊनची झळ आता सर्वांना बसू लागली आहे, विशेषत: अशा ठिकाणी की जेथे लोकवस्ती अत्यंत दाटीवाटीची आहे, घरांची रचना अगदी छोटी आहे, एकेक घरात ७-८ माणसे राहात आहेत, अशा भागांना लॉकडाऊनचा फटका बसू लागला आहे.

धारावीत सुमारे १ कोटी लोकसंख्या राहते असा अंदाज आहे. या प्रचंड लोकसंख्येला आज रोजचे अन्नधान्य बाहेरून पोहचवावे लागते. सरकार, स्वयंसेवी संघटना, पोलिस यांच्या मदतीने धारावी लॉकडाऊनमधील आपले कठीण दिवस काढत आहे.

लॉकडाऊनमुळे धारावीतील सर्व छोटे कारखाने, गृहउद्योग बंद आहेत. रोजंदारीवर काम करणारे घरात बसून आहेत. मुंबई उपनगरात काम करणारेही नोकरदारही घरात बसून आहे.

धारावीतील नजमा मोहम्मद सांगते, मी रोज कामाला जाण्याअगोदर मुलांना भरवून जात असे. मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होते, आता रोजगारच नसल्याने आयुष्य एकदम कठीण, दु:खदायक झालेय.

नजमाला एक मुलगा व दोन मुली आहेत व तिचे कुटुंब आता शेजारांच्या मदतीवर जगतेय.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून धारावीत निर्जुंतक फवारणी केली जात आहे. ८ एप्रिल,२०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून धारावीत निर्जुंतक फवारणी केली जात आहे. ८ एप्रिल,२०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आहे. पण या झोपडपट्टीची लोकसंख्या घनताही प्रचंड आहे. प्रचंड लोकसंख्या, शौचालय, सांडपाण्याची अपुरी व्यवस्था, अन्य पायाभूत सोयींची वानवा हे धारावीचे प्रश्न अनेक वर्ष आहेत. येथे काही भागात एका शौचालयाचा, स्नानगृहाचा वापर किमान १०० लोक करतात, पिण्याचे शुद्धपाणी मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. साबण वापरणे हेही अनेकांसाठी अशक्यप्राय बाब आहे.

लॉकडाऊन पुकारलेल्यानंतर धारावीत काही घरांना कुलुपे लावलेली दिसत आहे. अत्यंत दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या या झोपडपट्टीत एक खोलीच्या दारात महिला शिडीवर बसली आहे. १३ एप्रिल २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

झारखंडमधून धारावीत राहणार्या नामचंद मंडलला आता काहीही होऊ शकते अशी भीती वाटत आहे. माझ्या खोलीत ९ जण राहतात आम्ही सगळेच धोकादायक परिस्थितीत जगत असल्याचे नामचंद मंडल यांचे म्हणणे आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग शोधणारी तपासणी पथके धारावीत गल्ल्यागल्यात जाऊन चाचण्या करत आहे. एक डॉक्टर हजमत पोशाख व मास्क घालून एका रहिवाशाची तपासणी करत आहे. ९ एप्रिल २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

धारावीत अद्याप १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या संख्येत वाढ होईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

विषाणूतज्ज्ञ शाहीद जमील म्हणतात, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मुंबईच्या एकूण एक कोटी २० लाख लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या धारावीत राहते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असे जमील म्हणतात.

लॉकडाऊन पुकारल्यानंतर धारावीत सामाजिक विलगीकरण कटाक्षाने पाळावे यासाठी पोलिसांचा हा रुट मार्च. ११ एप्रिल २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

लॉकडाऊन पुकारल्यानंतर धारावीत सामाजिक विलगीकरण कटाक्षाने पाळावे यासाठी पोलिसांचा हा रुट मार्च. ११ एप्रिल २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी धारावीतील नागरिकांकडे मास्क नाहीत. बहुसंख्य नागरिक तोंडाला रुमाल, कापड बांधतात. अनेक गल्ल्यातील नागरिकांनी  संसर्ग वाढू नये, म्हणून हमालांच्या गाड्या, सायकली, बांबू रस्त्यावर ठेवले असून सर्व गजबज रोखण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कोरोनाचे इशारे देणारे फलकही लावले आहेत.

तरीही सामाजिक विलगीकरण पाळणे बहुसंख्यांसाठी अशक्य बाब आहे. कारण एकेक घरात ८-१० माणसे राहात असल्याने व दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने सामाजिक विलगीकरण पाळते येणे शक्य नसल्याचे येथील चित्र आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प असल्याने तरुण गट पत्ते, बुद्धीबळ वगैरे बैठे खेळ खेळताना दिसत आहेत. १० एप्रिल, २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प असल्याने तरुण गट पत्ते, बुद्धीबळ वगैरे बैठे खेळ खेळताना दिसत आहेत. १० एप्रिल, २०२०, छायाचित्र : फ्रान्सिस मस्कारेन्हस, रॉयटर

धारावीत अनेक असंघटित रोजगार आहेत. छोटे गृहउद्योग, कारखाने, अन्य व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात आहेत. आता लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असल्याने बुद्धिबळ, पत्ते, व्हिडिओ गेम्स, मोबाइलवर सिनेमा पाहणे, या सारखा विरंगुळा उरला आहे.

लॉकडाऊनची सवय नसल्याने पोलिसांची नजर चुकवून काही नागरिक रस्त्यावर फिरत असतात. असे कोणी सापडल्यास पोलिसांकडून जागच्या जागी, उठाबश्या, जोर-बैठका, माफीनामे अशा शिक्षा सुनावल्या जातात. काही वेळा लॉकडाउनचे उल्लंघन केला म्हणून पोलिसांकडून लाठीमारही केला जातो.

आपले कर्तव्य बजावताना पोलिसांना मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. कायदा-सुव्यवस्था पाळणे ही धारावीतील एक मोठी समस्या आहे, लोक आमचे ऐकत नाहीत, असे एका पोलिस कर्मचार्याने सांगितले. बँक कर्मचार्यांना मात्र पास दिल्याने त्यांना कामावर सोडले जाते. पण हे पास अन्य मित्रांना दिल्याच्या घटना पोलिसांच्या लक्षात येत आहेत, अशीही माहिती एका पोलिस कर्मचार्याने दिली.

मूळ बातमी

COMMENTS