कोरोनाबाधित बहुतांश नेते खासगी रुग्णालयात

कोरोनाबाधित बहुतांश नेते खासगी रुग्णालयात

नवी दिल्लीः २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व तसे ट्विटरवरून त्यांनी जाहीरही केले. शहा यांचा बंगला दिल्ली

गुजरातमध्ये कोविड मृतांबाबत लपवाछपवी
ऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी
आता धास्ती ‘बी वन वन सेव्हन’ची!

नवी दिल्लीः २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व तसे ट्विटरवरून त्यांनी जाहीरही केले. शहा यांचा बंगला दिल्लीतील ल्युटेन्स येथे आहे. पण त्यांना कोरोना झाल्यामुळे लगेचच त्यांना मेदांता या फाइव्ह स्टार रुग्णालयात हलवण्यात आले. शहा यांना मधुमेह असल्याने व मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या प्रकृतीला जपावे लागते. शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरताच एम्समधील डॉक्टरांची एक टीम मेदांता रुग्णालयासाठी तयार करण्यात आली. ही टीम शहा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असेल.

अशीच एक घटना २०१६मध्ये घडली होती. तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती बिघडल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम- चेन्नईतल्या एका खासगी रुग्णालयात जेथे जयललिता उपचार घेत होत्या,- तेथे तैनात करण्यात आली होती. त्यावेळी जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष केंद्रातील एनडीए सरकारमध्ये होता. जयललिता यांना चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात ठेवले होते व तेथून त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या येत होत्या. पण त्या बातम्यांची सत्यता पाहण्यासाठी दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांना तेथे तैनात करण्याचा भाग सरकारी चौकशी करण्यासारखा वाटत होता.

अमित शहा

अमित शहा

सध्या येत असलेल्या वृत्तानुसार असे म्हणता येऊ शकते की, शहा यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना मदत करण्यासाठी एम्सची टीम पाठवली गेली असली तरी तेथील परिस्थिती नेमकी काय आहे, हे कळण्याचे हे प्रयत्न आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की शहा सरकारच्या एम्स रुग्णालयात का दाखल झाले नाहीत? एम्स हे देशातील प्रतिष्ठित सरकारी रुग्णालय असून ते आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येत असताना शहा यांनी एम्सऐवजी मेदांता या खासगी रुग्णालयात भरती होण्याचा निर्णय का घेतला?

दिल्लीतील अनेक राजकीय नेते प्रकृतीत बिघाड झाल्यास सफदरजंग रुग्णालयात दाखल होत असतात. पण शहा तेथेही गेले नाहीत. त्यांनी दुसर्या राज्यात हरियाणात जाण्याचा निर्णय घेतला.

एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये २६० बेड असून तेथे कोविड-१९वरचे सर्व उपचार मिळतात. असे असूनही शहा यांनी तेथे दाखल होण्याचा का निर्णय घेतला नाही?

गेल्या १४ एप्रिलला भारतीय हवाई दलाने देशातील डॉक्टर, पॅरामेडिक्स, साफसफाईचा स्टाफ व अन्य आरोग्यसेवकांच्या कार्याला सलामी देत देशातील अनेक इस्पितळांवर फुलांची वृष्टी केली होती. त्यावेळी अमित शहा यांनी हिंदीमध्ये एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी ‘भारत या कोरोना योद्धांच्या सेवेला सलाम करत असून मोदी सरकार व हा संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. भारताला कोरोनामुक्त देश करायचा असून हे आव्हान संधीमध्ये परावर्तीत करायचे आहे. त्यातून हा देश आरोग्याच्यादृष्टीने सुदृढ, समृद्ध व बलवान करून जगापुढे एक आदर्श उदाहरण ठेवायचे आहे,’ असे ते म्हणाले होते.

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

आता ऑगस्ट महिना सुरू आहे आणि देशातील अनेक कोरोना योद्धांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील अनेक मरणही पावले आहेत. ज्यांनी उपचार घेतले ते सामान्य सरकारी रुग्णालयातच. असे अनेक लाखो कोरोना योद्धे आहेत की त्यांना खासगी रुग्णालये परवडणारी नव्हती पण त्यांनी आपल्या व्यवस्थेवर विश्वास दाखवला.

त्यामुळे आता देशातल्या अमित शहा यांच्यासह अन्य अनेक राजकीय नेत्यांना आठवण करून द्यावी लागणार आहे की, ज्यांनी या सरकारी कोरोना योद्ध्यांचे तोंडभरून कौतुक केले होते, त्या योद्ध्यांवर विश्वास दाखवण्यापेक्षा या नेत्यांनी स्वतःला कोरोना झाल्यानंतर सरकारी ऐवजी खासगी, महागड्या, पंचतारांकित रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करून घेणे अधिक पसंत केल 

तामिळनाडू व कर्नाटक

अमित शहा यांना कोरोना झाल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच दुसरे वृत्त तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, याचे आले. त्यांनाही चेन्नईतल्या अपोलो या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या राज्यात अन्य चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ऊर्जामंत्री पी. थांगमणी हे अपोलो रुग्णालयात तर उच्चशिक्षणमंत्री के. पी. अनबालागन व सहकारमंत्री सेल्लूर के. राजू हे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमॉटोलॉजी या खासगी रुग्णालयात कोरोनावरचे उपचार घेत आहेत. मजूरमंत्री निलोफर काफील यांनी घरात विलगीकरण करून घेतले आहे.

जवळच्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली. त्या अगोदर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोना झाला. हे दोघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

येडियुरप्पा बंगळुरूतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये आहेत. तर शिवराज सिंह भोपाळमधील चिरायू रुग्णालयात आहेत. चौहान यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास मंत्री रामखेलावन पटेल, सहकारमंत्री अरविंद सिंग भदोरिया हेही चिरायू रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत.

भाजपेतर पक्षांची राज्ये व त्यांचे नेते

काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमधील ग्रामीण विकासमंत्री त्रिप्तसिंग बाजवा हे मोहालीत फॉर्टीस रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. दिल्लीचे आप सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पहिल्यांदा राजीव गांधी इस्पितळात होते पण आता ते साकेत येथील खासगी मॅक्स हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात सरकारमधील असलेले मंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेही कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कँडी या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. जितेंद्र आव्हाड या आणखी एका मंत्र्याने मुलुंडमधील फोर्टिस या रुग्णालयात कोविडवर उपचार घेतले होते.

बिहार, झारखंडमध्ये वेगळे चित्र

बिहार व झारखंडमध्ये सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने येथील राजकीय नेते, मंत्री सरकारी रुग्णालयात दाखल झाले. माजी केंद्रीय मंत्री व राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह हे पटण्यातील एम्समध्ये दाखल झाले होते तर जिबेश कुमार मिश्रा यांचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

 रघुवंश प्रसाद सिंह

रघुवंश प्रसाद सिंह

बिहारमधील मंत्री व भाजपचे नेते विनोद कुमार सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची रवानगी कटिहार जिल्ह्यात कोरोनाचे सेंटर झालेल्या एका हॉटेलमध्ये करण्यात आली.

झारखंडमध्ये मिथिलेश ठाकूर या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली. त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गुजरातमध्ये एक मंत्री रमण पाटकर यांनी कोविड-१९ झाल्यानंतर सरकारी अनुदानाचे यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.

काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देब यांनी सिल्चर मेडिकल कॉलेजमध्ये कोविड-१९ झाल्यावर उपचार करून घेतले. त्याचबरोबर उ. प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमल रानी वरूण या कोरोना झाल्यानंतर लखनौमधील सरकारी रुग्णालय संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. पण त्यांचा २ ऑगस्टला मृत्यू झाला.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0