मुस्लिम स्वातंत्र्यवीरावरील चित्रपटावरून केरळमध्ये वाद

मुस्लिम स्वातंत्र्यवीरावरील चित्रपटावरून केरळमध्ये वाद

नवी दिल्लीः केरळमधील मलबार प्रांतात २० व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटिश सत्तेविरोधात लढणार्या वरियामकुन्नथ कुंजाहम्मीद हाजी या मुस्लिम स्वातंत्र्य सैनि

इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठरावावरील चर्चा २८ मार्चला
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं महानाट्य
सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज

नवी दिल्लीः केरळमधील मलबार प्रांतात २० व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटिश सत्तेविरोधात लढणार्या वरियामकुन्नथ कुंजाहम्मीद हाजी या मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकावर चित्रपट काढणार असल्याच्या घोषणेनंतर या चित्रपटाच्या निर्मिती संबंधित व्यक्तींविरोधात द्वेष मोहीम सुरू झाली आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिक अबू करणार असून प्रमुख भूमिका पृथ्वीराज सुकुमारन करणार आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रसिद्ध होणार असून वरियामकुन्नथ यांच्या नेतृत्वाखाली मलबार बंडाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

वरियामकुन्नथ यांच्यावर चित्रपट प्रसिद्ध होणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर OpIndia ने वरियामकुन्नथ यांना जिहादी व दहशतवादी असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील एक लेख २३ जूनला प्रसिद्ध झाला असून १९२१ साली मलबार बंडात वरियामकुन्नथ यांनी हजारो हिंदूंना ठार मारले असून त्या काळात शेकडो हिंदू मंदिरे उध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

पण या चित्रपटात वरियामकुन्नथची प्रमुख भूमिका साकारणारे पृथ्वीराज यांनी वरियामकुन्नथ यांचा लढा ब्रिटीश साम्राज्याविरोधात होता. ते एक धडाडीचे नेतृत्व होते, सैनिक व स्वातंत्र्यवीर होते, असा दावा सोशल मीडियात केला आहे.

१९२०ची खिलाफत चळवळ संपल्यानंतर त्याचे केरळमधील एक नेते अली मुसलीयार यांना अटक केल्यानंतर वरियामकुन्नथ यांनी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र बंड पुकारले. या बंडात त्यांनी काही शिपायांची व बंडखोरांची मदत घेऊन संपूर्ण मलबारमध्ये ब्रिटिशांविरोधात आघाडी उघडली. १९२१ मध्ये त्यांनी मलबारला स्वतंत्र राज्य म्हणूनही घोषित केले व ते या राज्याचे शासकही झाले. नंतर ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याला असलेला धोका पाहता व मलबार बंडात फूट पाडण्यासाठी वरियामकुन्नथ यांना मुस्लिम धर्मांध शासक ठरवले आणि त्यांच्या एका मित्राला फितूर करत १९२२मध्ये वरियामकुन्नथ यांना अटक करून त्यांना फाशी दिले.   

  मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0