फिल्म्स डिव्हिजन स्वतंत्रच हवे!

फिल्म्स डिव्हिजन स्वतंत्रच हवे!

गेल्या महिन्यात एका वरिष्ठ बांगलादेशी अधिकाऱ्याने टेलिफोनवरील संभाषणात, फिल्म्स डिव्हिजनमधील डॉक्युमेंट्री फिल्ममेकरबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाने मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी अचानक विचारले, “प्रेम वैद्य तुमच्या कुटुंबातले आहेत का?”

बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना माझ्या वडिलांची आणि त्यांचे सहकारी एस. सुखदेव यांची आठवण काढली जाण्याचे एकच कारण होते. १९७१ साली पूर्व पाकिस्तानात धडक मारणाऱ्या मोजक्या धाडसी फिल्म्स डिव्हिजन (एफडी) डॉक्युमेंट्री फिल्ममेकर्सपैकी ते एक होते. ते भारत-पाकिस्तान युद्ध, मुक्तिबाहिनीची ऑपरेशन्स, भारतात येणारे हजारो निर्वासित, पाकिस्तानाची शरणागती आणि पाठोपाठ बांगलादेशाला मिळालेले स्वातंत्र्य या सगळ्याचे फिल्मिंग करत होते. ते सगळे फूटेज आता एफडीच्या अमूल्य अर्काइव्ह्जचा भाग आहे. शेख मुजिबुर रहमान यांच्या, श्याम बेनेगल दिग्दर्शित, बायोपिकमध्ये या फूटेजला नक्कीच जागा मिळाली असती. प्रत्यक्षात मात्र एफडीच्या ७४ वर्षाच्या इतिहासामध्ये, अनेक भारतीय भाषांत तयार झालेल्या ८००० फिल्म्सच्या खजिन्याची कुठेही फारशी नोंद नाही आणि त्याची कोणाला किंमतही नाही. एफडीमधील आणि बाहेरील दिग्गजांनी तयार केलेल्या या फिल्म्सना १,२०० पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील १,०२७ पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहेत आणि एफडी अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या ४० वर्षांत ते मिळालेले आहेत.

आज ओटीटी प्लॅटफॉर्म्स, टीव्ही स्टेशन्सकडून दृकश्राव्य निर्मितीला प्रचंड मागणी असताना, भारत सरकारने एफडी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे, ही बोचरी विसंगती आहे.

एकेकाळी जगातील सर्वांत मोठी लघुपट निर्माती म्हणून नावाजलेली एफडी नवीन उद्दिष्टांसह, एक सरकारी प्रसारण निर्मिती संस्था आणि भारत, आशिया व आफ्रिकेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून पुनरुज्जीवत करण्याची आवश्यकता आहे. एफडी मुंबईतील पेडर रोडवरील मोक्याच्या ठिकाणी आहे. ही मालमत्ता विकून तो पैसा एफडीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरणे सहज शक्य आहे.

मशीनगनच्या गोळ्यांची साखळी घातलेले प्रेम वैद्य.

मशीनगनच्या गोळ्यांची साखळी घातलेले प्रेम वैद्य.

१९४८ मध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या एफडीचे मूलभूत कार्य सरकारसाठी प्रचारपट तयार करणे हे होते. फिल्ममेकिंगची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सनदी अधिकाऱ्यांची एफबीवर भक्कम पकड होती आणि कोणत्या फिल्म्स तयार करायच्या त्याचा निर्णय हे अधिकारी घेत होते. क्वचित लाभलेले द्रष्टे नेते आणि मोजक्या फिल्ममेकर्सनी दाखवलेली सृजनशीलता यापलीकडे येथे काहीही होत नव्हते. मात्र, एफडीचे सर्वांत मोठे अपयश म्हणजे ही संस्था काळानुरूप बदलू शकली नाही आणि भविष्याची दृष्टी संस्थेकडे अजिबात नव्हती. ‘एफडी भारताच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्याने ते बंद करण्याची गरज आहे’ असे श्याम बेनेगल यांचे विधान पीटर सुटोरिस यांनी फिल्म्स डिव्हिजनवर सखोल संशोधनांती लिहिलेल्या पुस्तकात आहे.

इतिहास

भारतातील माहितीपट निर्मितीचा इतिहास आणि एफडीचा इतिहास या दोन्ही बाबी एकच आहेत. एफडीचे आद्य स्वरूप म्हणजे ब्रिटिश राजवटीत १९४० मध्ये स्थापन झालेला फिल्म अॅडवायजरी बोर्ड होय. त्यानंतर १९४३ मध्ये इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया (आयएफआय) ही संस्था अस्तित्वात आली. हॉलिवूडच्या युनिव्हर्सल स्टुडिओत संकलक म्हणून काम केलेल्या एझ्रा मिर यांनी या संस्थेची धुरा वाहिली. ते नंतर १९५६ मध्ये फिल्म्स डिव्हिजनचे मुख्य निर्माते झाले. १९४०च्या दशकातच इंडियन न्यूज परेडला ‘न्यूजरील्स’ची ओळख करून देण्यात आली. सुटोरिस यांच्या मते, १९४३ आणि १९४६ या तीन वर्षांत आयएफआयने १२६ साप्ताहिक ‘न्यूजरील्स’ची निर्मिती केली तसेच पाच वर्षांच्या काळात १७५ माहितीपट काढले. १९४३ मध्ये एफएबीने सर्व चित्रपटगृहांना मुख्य चित्रपटापूर्वी सरकारी माहितीपट व न्यूजरील दाखवणे सक्तीचे केेले. फिल्म्स भाड्याने घेण्यासाठी चित्रपटगृहांना मासिक शुल्क भरावे लागत असे. हाच एफडीसाठी उत्पन्नाचा स्रोत होता.

चित्रपट आणि राष्ट्राचा विकास

सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विकास उपक्रमांची माहिती जनतेला देण्यासाठी माहितीपटांचा उपयोग करण्याचा पाया जॉन ग्रीअर्सन यांनी घातला. ते १९४०च्या दशकात युनेस्कोमध्ये मास कम्युनिकेशन विभागाचे संचालक होते. वसाहतींमधील स्थानिकांना माहितीपट काढण्याचे प्रशिक्षण देण्याचा आग्रह ग्रीअर्सन यांनी धरला. जेणेकरून सरकारच्या कार्यक्रमांची माहिती त्यांना त्यांच्या स्वत:च्या शब्दांत चित्रपट या प्रभावी माध्यमांद्वारे देता यावी. हाच दृष्टिकोन पुढे १९४९ मध्ये प्रसिद्ध लेखक मुल्कराज आनंद यांनी मांडला. माहितीपटांना भारतात दृश्य शिक्षणाचे सर्वांत महत्त्वाचे स्वरूप म्हणजे मान्यता देण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही मत असेच होते आणि पहिले माहिती व प्रसारण मंत्री वल्लभभाई पटेल यांच्यासह त्यांनी सरकारच्या विकास कार्यक्रमांच्या प्रचारात फिल्म्सना महत्त्वाची भूमिका दिली. त्यामुळेच विशाल धरणे, ऊर्जा प्रकल्प, स्टील कारखाने यांच्या उभारणीसह सर्व आघाड्यांवर सरकारने केलेली कामे तसेच भारताचा इतिहास, संस्कृती व वैविध्य यांचे चित्रण एफडीने केले. टेलीव्हिजन येण्यापूर्वी न्यूजरील बुलेटिन्स जनतेला देशातील घडामोडींची माहिती देत होती.

हॉलिवूडमधून प्रशिक्षण

जगत मुरारी, व्ही. रामकांत सरमा, रवि प्रकाश, मुशीर अहमद आणि के. एल. खांडपूर या एफडीमधील फिल्ममेकर्सना सदर्न कॉलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून प्रशिक्षण देण्यात आले होते. एफडीचे पहिले मुख्य निर्माचे मोहन भवनानी यांना जर्मनीतील यूएफए स्टुडिओतून प्रशिक्षण मिळाले होते. १९५७ मध्ये एफडीने कार्टून फिल्म विभाग सुरू करून, भारतात अॅनिमेशनपटांचा पाया घातला. वॉल्ट डिस्नेतील क्लेअर एच वीक्स यांची नियुक्ती कन्सल्टण्ट म्हणून करण्यात आली होती. या विभागाचे प्रमुख प्रमोट पटी यांनी प्रागमधून अॅनिमेशनपटांचे प्रशिक्षण घेतले होते, तर नंतर त्यांच्या जागी आलेले जी. के. गोखले यांना कॅनडातील नॅशनल फिल्म बोर्डाने प्रशिक्षण दिले होते.

१९५५ मध्ये ब्रिटिश अभिनेते व समीक्षक सर्जी आइनस्टाइन व सत्यजित रे यांनी जागतिक सिनेमाच्या प्रवाहाची ओळख करून देणारे ३६ चित्रपट मुंबईत आणले. एफडीमधील फिल्ममेकर्सना हे चित्रपट बघून विश्लेषण करण्यासाठी उत्तेजन देण्यात आले.

एफडीने पहिल्याच दशकात आपली गुणवत्ता सिद्ध केली असली, तरी चित्रपट हे माध्यम अजिबात न समजणाऱ्या अधिकाऱ्यांचे एफडीवर नियंत्रण होते.

एफडीने पहिल्याच दशकात आपली गुणवत्ता सिद्ध केली असली, तरी चित्रपट हे माध्यम अजिबात न समजणाऱ्या अधिकाऱ्यांचे एफडीवर नियंत्रण होते.

१९६०च्या दशकाच्या मध्यापर्यंत एफडी दर आठवड्याला तीन फिल्म्स व साप्ताहिक न्यूजरील प्रदर्शित करत होते. एफडीच्या देशभरातील कर्मचाऱ्यांची संख्या ८६० होती. यात १९ दिग्दर्शक होते.

नोकरशाहीचे नियंत्रण

एफडीने पहिल्याच दशकात आपली गुणवत्ता सिद्ध केली असली, तरी चित्रपट हे माध्यम अजिबात न समजणाऱ्या अधिकाऱ्यांचे एफडीवर नियंत्रण होते. विषय व उद्दिष्टांबाबत नोकरशहांची हुकूमशाही होती. विविध मंत्रालयांमधील अधिकारी प्रचारपटांवर नियंत्रण ठेवून होते. सेन्सॉर बोर्डाचे आणि फिल्म अॅडवायजरी बोर्डाचे एफडीवर बारीक लक्ष होते.

याचा एफडीच्या सर्जनशीलतेवर खोलवर परिणाम झाला. एकसुरी फिल्म्स तयार होऊ लागल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एस. विश्वम यांच्या लेखात यावर बोट ठेवण्यात आले होते.

भावनगरी युग

युनेस्कोमध्ये जनसंवाद तज्ज्ञ म्हणून काम केलेल्या बहुआयामी जहांगीर भावनगरी यांनी दोन टप्प्यात एफडीमध्ये काम केले. १९५४ ते १९५७ ते उपमुख्य निर्माते म्हणून कार्यरत होते, तर १९६५-६६ मध्ये तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांना माहिती व प्रसारण खात्याचे मुख्य सल्लागार (चित्रपट) म्हणून रूजू होण्याची विनंती केली. याच काळात एफडीच्या सर्जनशील स्वातंत्र्य व प्रतिभेची सर्वोत्तम अभिव्यक्ती बघायला मिळाली. हा काळ एफडीच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. इंदिरा गांधी व माहिती-प्रसारण सचिव अशोक मित्रा यांनी स्वातंत्र्य दिल्यामुळे भावनगरी यांनी प्रचारपटांचे ग्रिअर्सोनियन प्रारूप मोडून काढले. अत्याधुनिक कमी

सुखदेव, श्याम बेनेगल, एसएनएस शास्त्री, फली बिलिमोरिया आणि प्रेम वैद्य या फिल्ममेकर्सनी याच काळात आपले सर्वोत्तम काम केले.

सुखदेव, श्याम बेनेगल, एसएनएस शास्त्री, फली बिलिमोरिया आणि प्रेम वैद्य या फिल्ममेकर्सनी याच काळात आपले सर्वोत्तम काम केले.

वजनाचे कॅमेरा आणि पोर्टेबल साउंड रेकॉर्डिंग उपकरणे एफडीमध्ये आली. सुखदेव, श्याम बेनेगल, एसएनएस शास्त्री, फली बिलिमोरिया आणि प्रेम वैद्य या फिल्ममेकर्सनी याच काळात आपले सर्वोत्तम काम केले. वसाहतवादी चित्रपटनिर्मितीचा साचा मोडला गेला. स्वातंत्र्योत्तर काळातील माहितीपटांची भूमिका, प्रायोगिक चित्रपटांमधील सामाजिक एकात्मता आणि सरकार प्रायोजित चित्रपटांमध्ये सर्जनशील स्वातंत्र्याची गरज या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली, असेही म्हटले जाते.

एसएनएस शास्त्री यांची आय अॅम ट्वेंटी, शांती वर्मा यांची राधा अँड कृष्णा, सुखदेव यांची इंडिया सिक्स्टीसेव्हन, प्रमोद पती यांची एक्स्प्लोअरर आणि एम. एफ हुसैन यांची थ्रू द आईज ऑफ अ पेंटर अशा काही अप्रतिम फिल्म्स भावनगरी काळात आल्या. जगमोहन, एनव्हीके मूर्ती आणि एन. एस. थापा यांच्या काळातही द्रष्टे नेतृत्व आणि सर्जनशील स्वातंत्र्याच्या काही लाटा येऊन गेल्या.

मात्र, हे अपवाद वगळता नोकरशाहीच्या अतिनियंत्रणाचे विष एफडीमध्ये वर्षानुवर्षे भिनत राहिले. तरीही सध्या आपण ज्या माध्यम व संवादाच्या तसेच रूपांतरणाच्या विश्वात जगत आहोत, त्या विश्वात एफडी बंद करून टाकणे योग्य नाही. पेडर रोडवरील मालमत्तेच्या विक्रीतून येऊ शकणाऱ्या अब्जावधी रुपयांतून एफडीचे केवळ भारतातील नव्हे, तर आशिया व आफ्रिकेतील, माहितीपटांचे केंद्र, म्हणून पुनरुज्जीवन करता येईल. विद्यार्थी व व्यावसायिकांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून एफडीचा विकास करता येईल.

मूळ लेख:

COMMENTS