पिगॅससद्वारे हेरगिरी केल्याचा फिनलंड सरकारचा दावा

पिगॅससद्वारे हेरगिरी केल्याचा फिनलंड सरकारचा दावा

स्टॉकहोमः परदेशात राहात असलेल्या फिनलंडच्या परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांच्या मोबाइलमध्ये पिगॅसस स्पायवेअरची घुसखोरी करून त्यांच्यावर पाळत ठेवली जात

‘जगात कोविड-मृतांची संख्या ३० लाखाहून अधिक’
हे तू चांगलं नाही केलंस, सुधीर!
सावरकरांचे चरित्रकार संपत यांच्यावर साहित्यचोरीचे आरोप

स्टॉकहोमः परदेशात राहात असलेल्या फिनलंडच्या परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांच्या मोबाइलमध्ये पिगॅसस स्पायवेअरची घुसखोरी करून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे फिनलंडच्या गुप्तचर खात्याचे म्हणणे आहे. २८ जानेवारीला या खात्याने जाहीरपणे असा दावा केला. ही हेरगिरी एखाद्या देशातील सरकारकडून सुरू आहे असेही गुप्तचर खात्याने म्हटले आहे.

फिनलंडच्या परराष्ट्र खात्यानेही पिगॅसस द्वारे आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांचे आयफोन व अँड्रॉइड फोन हॅक करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या घुसखोरीतून संवेदनशील माहिती घेण्यात आली आहे व ती कोणाच्याही परवानगी शिवाय घेण्यात आली आहे असेही फिनलंड सरकारचे म्हणणे आहे. पण कोणत्या स्वरुपाची संवेदनशील माहिती चोरण्यात आली व किती अधिकाऱ्यांचे फोन हॅक करण्यात आले याची माहिती सरकारने उघड केलेली नाही.

पिगॅसस विकसित करणाऱ्या एनएसओ कंपनीने या पूर्वीच त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. ग्राहक कोणते स्पायवेअर वापरतात त्यावर आमचे नियंत्रण नसते. आमच्या कंपनीने कोणतीही माहिती चोरलेली नाही व कोणत्याही ग्राहकाचा डेटा आमच्यापर्यंत आलेला नाही. आमच्या ग्राहकाकडून एखादी माहिती चोरल्याची निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल व फिनलंड सरकारला तपासात सर्व मदत केली जाईल असे एनएसओने म्हटले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0