जीडीपी १० ते १२ टक्के घसरणारः रेटिंग्ज कंपन्या

जीडीपी १० ते १२ टक्के घसरणारः रेटिंग्ज कंपन्या

नवी दिल्लीः फिंच व इंडिया रेटिंग्ज या दोन वित्तीय कंपन्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत अनुक्रमे १०.५ टक्के व ११.८ टक्के

९६६ आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया सुरू
‘काश्मीर स्वर्ग नव्हे नरक झालाय’
मोदी नाही तर मग कोण?

नवी दिल्लीः फिंच व इंडिया रेटिंग्ज या दोन वित्तीय कंपन्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत अनुक्रमे १०.५ टक्के व ११.८ टक्के घसरणीचा अंदाज वर्तवला आहे.

३१ जुलैला राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने चालू आर्थिक वर्षातल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी २३.९ टक्के इतका घसरल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दोन रेटिंग्ज कंपन्यांनी एकूण आर्थिक वर्षाच्या जीडीपीचा अंदाज वर्तवला आहे.

फिचच्या मते कोरोना महासाथ नियंत्रणात येत नसून देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावणे भाग पडले होते, त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पण देशातला लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असल्याने अर्थव्यवस्थेच्या चाकांना गती मिळत आहे. लॉकडाऊनचा परिणाम लघु व मध्यम उद्योगांवर जबर झाला आहे. हे उद्योग उभे राहतील तसे परिस्थितीत सुधारणा होत जाईल, असे फिचचे म्हणणे आहे. फिचने कुटुंबांच्या उत्पन्नात वेगाने घसरण झाल्याचेही सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या काळात देशातील गुंतवणूकही कमी झाली असून बँकिंग व्यवस्थेवरही त्याचे परिणाम झाल्याचे सांगत फिचने करातल्या संकलनात घट झाल्याचा मुद्दा मांडत उत्पादन शुल्कात झालेली वाढ ही किंमतवाढीला कारणीभूत ठरली असल्याचे नमूद केले आहे. दुसर्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) जीडीपीतील घसरण ९.६ टक्के, त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत ४.८ टक्के व पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत ४ टक्के घसरण होईल असा फिचचा अंदाज आहे.

इंडिया रेटिंग्ज या अन्य कंपनीने चालू आर्थिक वर्षातील एकूण घसरण ११.८ टक्के होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या अगोदर या कंपनीने ५.३ टक्के घसरण होईल असा अंदाज वर्तवला होता. या आर्थिक वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा १८.४४ लाख कोटी रु. नुकसान झाल्याचे इंडिया रेटिंग्जचे म्हणणे आहे. पण या कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग ९.९ टक्क्याने वाढेल असाही अंदाज वर्तवला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0