नवी दिल्लीः कोरोना महासाथीविरोधात लढण्यासाठी मोदी सरकारने जारी केलेल्या आरोग्य सेतू अॅपच्या प्रचारावर ४ कोटी १५ लाख रु. खर्च झाल्याची माहिती आहे. हा ख
नवी दिल्लीः कोरोना महासाथीविरोधात लढण्यासाठी मोदी सरकारने जारी केलेल्या आरोग्य सेतू अॅपच्या प्रचारावर ४ कोटी १५ लाख रु. खर्च झाल्याची माहिती आहे. हा खर्च गेल्या तीन महिन्यात केला गेला आहे.
माहिती अधिकार कायद्यांअंतर्गत ही माहिती केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातील बीओसी या विभागाने दिली आहे. बीओसीने दिलेल्या माहितीनुसार १६ जुलै २०२० पर्यंत केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅपवर ४ कोटी १५ लाख रु. खर्च केले असून हा पैसा प्रिंट मीडियात जाहिरातीच्या माध्यमासाठी ९४ लाख ६७ हजार रु. तर टेलिव्हिजनवर ३ कोटी २० लाख रु. खर्च करण्यात आला आहे. पण रेडिओ व इंटरनेटच्या माध्यमातून या अॅपवर खर्च करण्यात आलेला नाही.
उ. प्रदेशमधील अनिकेत गौरव यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मागवली होती.
कोरोनाची साथ वाढत असल्याचे पाहून मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅप आणले होते. कोविड-१९ रुग्णांना हे अॅप त्यांच्या मोबाइलवर डाऊनलोड करणे सक्तीचे केले होते, तसेच परदेशातून भारतात येणार्या सर्व नागरिकांना हे अॅप डाऊनलोड करणे सरकारने बंधनकारक केले होते. त्याचबरोबर या अॅपच्या माध्यमातून नागरिकांची गोपनीय माहिती सरकारजमा होते असा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.
सध्या हे अॅप देशभरात १५ कोटी ५० लाख मोबाइल ग्राहकांनी डाऊनलोड केले असून २९ ऑगस्ट २०२० रोजी केंद्र सरकारने अनलॉक-४च्या घोषणेत आरोग्य सेतूच्या अॅपवर भर दिला होता. सर्व ऑफिस, कार्यालयांमधील कर्मचार्यांनी हे अॅप डाऊनलोड करावे, त्याचबरोबर देशातील सर्व जिल्ह्यातील प्रशासन कर्मचार्यांना व नागरिकांना हे अॅप डाऊनलोड करावे म्हणून गृहखात्याने सूचना दिल्या होत्या.
मूळ बातमी
COMMENTS