‘भारताला मदत करण्यात जगाला आलं अपयश’

‘भारताला मदत करण्यात जगाला आलं अपयश’

भारतात आलेल्या कोविड-१९च्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जगाने भारताला मदत करणे आवश्यक होते पण तशी मदत जग करू शकलेला नाही, या पार्श्वभूमीवर श्रीमंत देशां

कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्यः आयएमए
पारंपरिक मच्छिमार : मत्स्य दुष्काळ, सीआरझेड व कोरोना
कोविड-१९ निर्बंधः विविध बाबींचे स्पष्टीकरण

भारतात आलेल्या कोविड-१९च्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जगाने भारताला मदत करणे आवश्यक होते पण तशी मदत जग करू शकलेला नाही, या पार्श्वभूमीवर श्रीमंत देशांनी आपली जबाबदारी म्हणून भारताला मदत करावी, असे आवाहन अमेरिकेचे व्हाइट हाउसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी केली आहे. सध्याच्या घडीला भारतात आलेली दुसरी लाट थोपवण्यासाठी केवळ आणि केवळ जगाने एकत्र मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले. गार्डियन ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फाऊची यांनी कोविडचा मुकाबला करण्यासाठी जग एकत्र अद्याप आलेले नाही, याबद्दलही खंत व्यक्त केली. जगातील श्रीमंत देशांनी या घडीला एकत्र येऊन कोविड महासाथीचा मुकाबला करणार्या देशांना मदत करायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतात ऑक्सिजन अभावी, रुग्णालयात बेड नसल्याकारणाने रुग्ण मरत आहेत, ही स्थिती अत्यंत विदारक असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. आपण सर्व एकत्र आलो, प्रत्येक देशाने आपल्या जबाबदार्या ओळखल्या, विशेषतः श्रीमंत देशांनी आपली मदत अधिक देऊ केली तर परिस्थिती सुधारू शकते, असे डॉ. फाऊची म्हणाले.

भारतात गेल्या बुधवारी सकाळ अखेर ३ लाख ६० हजार ९६० नवे कोरोना रुग्ण आढळले असून ३,२९३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या आजपर्यंतची सर्वोच्च असून कोरोना महासाथीत मोठ्या प्रमाणात झळ बसलेल्या भारताला मदत देण्यासाठी १७ देश पुढे आले आहेत. बुधवारी भूतानने भारताला ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुढील महिन्यात अमेरिका अस्ट्राझेनेका लसीचे १ कोटी डोस भारतात पाठवेल अशी चिन्हे आहेत.

अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी, आर्यंलंड, बेल्जियम, रुमानिया, लक्झेंबर्ग, पोर्तुगल, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, भूतान, सिंगापूर, सौदी अरेबिया, हाँग काँग, थायलंड व यूएईने मदत देण्यास सुरूवात केली आहे.

अमेरिका ऑक्सिजन बरोबर रेमडेसिविर, पीपीई कीट, विविध औषधे व कोविड प्रतिबंधित लस पुरवणार असल्याचे डॉ. फाऊची यांनी सांगितले.

ब्रिटन या आठवड्यात भारताला ४९५ ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स, १२० नॉन इव्हेसिव्ह व्हेंटिलेटर, २० मॅन्युअर व्हेंटिलेटर पाठवत आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनने १०० व्हेंटिलेटर व ९५ ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स पाठवले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0