फ्रान्सकडून ४०० पुरातन वस्तू पाकिस्तानला परत

फ्रान्सकडून ४०० पुरातन वस्तू पाकिस्तानला परत

सिंधू खोऱ्यातील कबरस्तानांतून चोरलेल्या या पुरातन वस्तूंची अंदाजे किंमत १३९,००० युरो इतकी आहे.

२ जुलै रोजी फ्रान्सने ४०० हून अधिक पुरातन वस्तू पाकिस्तान सरकारला परत केल्या. या चोरीच्या वस्तूंमध्ये प्राचीन अर्धपुतळे, फुलदाण्या, सुरया आणि कलश इ. चा समावेश आहे, आणि त्यातील काली ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या सहस्त्रकांमधल्या आहेत.

यापैकी अनेक वस्तू सप्टेंबर २००७मध्ये पॅरिसमधील एका गॅलरीच्या पत्त्यावर आलेल्या पार्सलमध्ये सापडल्या होत्या. ही खोकी रॉइसी चार्ल्स द गॉल विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केली होती आणि त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्च या संस्थेने त्या वस्तू पाकिस्तानातील सिंधू खोऱ्यातील कबरस्तानांमधून चोरलेल्या असल्याचे शोधले होते.

त्याच गॅलरीमध्ये चाललेला आणखी मालही दोन आठवड्यांपूर्वी थांबवण्यात आला होता. त्यामध्ये मातीची भांडी आणि टेराकोटाच्या वस्तू होत्या. आणि या गॅलरीच्या, जिचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही,परिसराचा शोध घेतला असताला कस्टम अधिकाऱ्यांना आणखी अनेक सिरॅमिकच्या वस्तू सापडल्या, ज्या त्यांनी जप्त केल्या.

२ जुलै रोजी पॅरिसमधील पाकिस्तान दूतावासात झालेल्या एका कार्यक्रमात, ४४५ वस्तू पाकिस्तानला परत करण्यात आल्या. या वस्तूंची अंदाजे किंमत १३९,००० युरो ($१५७,०००) इतकी आहे.

या मोहिमेचे प्रमुख मुहम्मद अझीझ काझी म्हणाले,“हा पाकिस्तानसाठी खरोखरच खास क्षण आहे.हा खूप भावनोत्कट क्षणही आहे. आज आमचा विश्वास आहे की पाकिस्तानचा वारसा पुन्हा आपल्या मायदेशी परतत आहे.”

काझी म्हणाले की हा खजिना शक्य तितक्या लवकर इस्लामाबादला परत पाठवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. “आशा आहे की हे लवकरच होईल… पाकिस्तानात आमच्याकडे असलेल्या एका सर्वोत्तम वस्तुसंग्रहालयामध्ये तुम्हाला त्या पहायला मिळतील.”

ही लूट ज्या गॅलरीला पाठवली जात होती त्या गॅलरीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या गॅलरीला चोरीच्या वस्तू स्वीकारल्याबद्दल १००,००० ते २००,००० युरो इतका दंड केला जाऊ शकतो.

दक्षिण आशियाई पुरातत्त्वातील एक तज्ञ ऑरोरे दिदिए म्हणाल्या, दक्षिण पाकिस्तानातील बलुचीस्तानात पुरातन वस्तूंच्या चोरीचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे कोणे एके काळी तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल  मानववंशशास्त्रीय डेटा गोळा करणे हे खूपच कठीण झाले आहे.

“याच केवळ अधाशी स्मगलर सामील नाहीत, आंतरराष्ट्रीय कला बाजारपेठही त्याला तितकीच जबाबदार आहे,” त्या म्हणाल्या, “या चोरीच्या वस्तूंची खरेदी विक्री बलुचीस्तानमध्ये खूपच प्रचलित होती.”

फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन हे प्राचीन कलावस्तू त्या त्या देशाकडे परत पाठवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. मागच्या नोव्हेंबरमध्ये, त्यांनी फ्रेंच वस्तुसंग्रहालयात असलेल्या काही डझन वस्तू पूर्वीची फ्रेंच वसाहत असलेल्या बेनिन येथे परत पाठवण्याच्या योजनेची घोषणा केली.

या वर्षी अनेक वस्तू पेरूमध्येही परत पाठवण्यात आल्या आणि २०१४-२०१७ या काळात लंडनला चाललेल्या एका ब्रिटिश नागरिकाच्या सामानात आढळून आलेल्या इजिप्शियन प्राचीन काळातील २५० हून अधिक वस्तू कैरोला परत करण्यात आल्या.

(रॉयटर्स)

मूळ लेखयेथे वाचावा.

(छायाचित्र – ४४५ पैकी काही वस्तू ख्रिस्तपूर्व २ऱ्या आणि ३ऱ्या सहस्त्रकातील आहेत. छायाचित्र: रॉयटर्स मार्फत फिलिप वोजाझेर.)

 

COMMENTS