राज्यात मोफत लसीकरण : ठाकरे यांची घोषणा

राज्यात मोफत लसीकरण : ठाकरे यांची घोषणा

राज्यामध्ये लवकरच १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

प्रेषित पैगंबरांवर टिप्पण्णीः भाजपच्या आमदाराला अटक
मोदी सरकारचा रोजचा जाहिरात खर्च १ कोटी ९५ लाख
इम्रान खान सरकार पडण्याची शक्यता; मित्र पक्षांनी साथ सोडली

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यासमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये

लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी लस विकत घ्याव्या लागतील आणि ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे,  अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मात्र येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण राज्याकडे लसींचा तेव्हढा साठा उपलब्ध नाही.

“येत्या ६ महिन्यांत लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी एकूण १२ कोटी डोस लागतील. दर महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागतील. ही राज्य शासनाची क्षमता आहे. १३ हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्या संस्थांच्याद्वारे राज्यात रोज १३ लाख लोकांना लस देता येऊ शकेल. देशात सर्वात कमी लसी वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात आहे. सध्या राज्यात १ टक्के लसी वाया जाण्याचं प्रमाण आहे”, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोनच लसी सध्या खरेदीसाठी देशात उपलब्ध आहेत.  कोवॅक्सिनने या आणि पुढच्या महिन्यात १० लाख लसी देणार असल्याचे सांगितले आहे. कोविशिल्ड महिन्याला १ कोटी लसी देणार असल्याचे तोंडी स्वरूपात सांगितले आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीबाबत देखील मुख्यमंत्र्यांणी चर्चा केली आहे. योग्य दरात मिळाल्यास स्पुटनिक लसीचा देखील समावेश लसीकरण कार्यक्रमात करण्यात येईल. झायडस कॅडिला आणि जॉन्सं अॅन्ड जॉन्सन या दोन लसी देखील ऑगस्ट महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0