फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकात अटक

फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकात अटक

नवी दिल्लीः कॅरिबियन बेट समुहातील अँटिग्वा व बर्म्युडामधून रविवारी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६२) याला डॉमिनिका येथे मंगळवारी ताब्यात घेत

चे, फिडेल आणि मॅराडोना
अफगाणिस्तानातील ११० शीख भारतात येण्यास आतूर
परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीयांना तात्काळ खार्किव्ह सोडण्यास सांगितले

नवी दिल्लीः कॅरिबियन बेट समुहातील अँटिग्वा व बर्म्युडामधून रविवारी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६२) याला डॉमिनिका येथे मंगळवारी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. डॉमिनिका येथील स्थानिक प्रसार माध्यमांनी चोक्सी याला क्युबात पळून जाताना अटक केल्याचे म्हटले आहे. आता त्याला अँटिग्वाच्या रॉयल पोलिस फोर्सकडे देण्याची प्रक्रिया होईल, असे स्थानिक प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे.

मेहुल चोक्सी अँटिग्वा व बर्म्युडाचा नागरिक आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रु.च्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी भारतीय तपास यंत्रणा मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा प्रयत्न करत असताना चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याचे वृत्त आले होते व तो क्युबात पळून जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण मंगळवारी त्याला डॉमिनिका येथे ताब्यात घेतले.  जानेवारी २०१८पासून चोक्सी अँटिग्वामध्ये राहात होता.

सोमवारी अँटिग्वातून चोक्सी फरार झाल्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात यलो कॉर्नर नोटीस बजावली होती. चोक्सीचे फरार होण्याचे वृत्त सीबीआय औपचारिक व अनौपचारिक पातळीवर पडताळून पाहात आहे. तर चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी आपला अशील फरार झाल्याचे म्हटले होते.

गेल्या रविवारी चोक्सीला कारमधून जाताना पाहण्यात आले होते. ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.

चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आणखी एक प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा काका असून नीरव मोदीलाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

पीएनबीमध्ये सुमारे १३ हजार कोटी रु.चा घोटाळा झाला असून चोक्सीने ७,०८०.८६ कोटी रु. तर मोदीने ६ हजार कोटी रु.चा घोटाळा केल्याचा भारतीय तपास यंत्रणांचा दावा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0