बीजिंगः लडाखमधील गलवान नदीच्या खोरे आमचेच असल्याचे चीनने शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले. गलवान खोरे भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलिकडे
बीजिंगः लडाखमधील गलवान नदीच्या खोरे आमचेच असल्याचे चीनने शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले. गलवान खोरे भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलिकडे चीनच्याच हद्दी असून या खोर्यात अनेक वर्षे चीनचे सैनिक गस्त घालत आहेत व ते कर्तव्य बजावत असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याने शुक्रवारी सांगितले.
चीनच्या या दाव्याला एक दिवस उशीराने फेटाळत शनिवारी भारतीय परराष्ट्र खात्याने चीनचा हा दावा अवास्तव व अवाजवी असून तो आम्हाला अमान्य असल्याचे सांगितले.
गलवान खोर्यातील भूभाग हा ऐतिहासिक दृष्ट्या चीनचा नाही. चीनला इतिहास माहिती आहे. या प्रदेशात व भारत-चीन सीमांच्या सर्व विभागात असणार्या प्रत्यक्ष ताबा रेषाबाबत भारत परिचित आहे. भारताचे सैनिक या प्रदेशात कित्येक वर्षे गस्त घालत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच चीनने या प्रदेशातील भारतीय गस्तीला आडकाठी करण्याचे प्रयत्न सुरू केले असे परराष्ट्र खात्याने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गुरुवारी भारताने गलवान खोर्यावरील चीनच्या ताब्याला हरकत घेतली होती पण शुक्रवारी पुन्हा गलवान खोरे आपलेच असल्याचे सांगून चीनने या खोर्यावरील भारताचा दावा फेटाळला होता. गुरुवारी भारताने चीनच्या दावा अवाजवी असल्याचा आरोप करत ६ जूनला झालेल्या द्विपक्षीय चर्चेत या विषयावर झालेल्या सहमतीला छेद देणारा असल्याचे म्हटले होते.
चीनने शुक्रवारी हा दावा केल्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनने घुसखोरी केली नसून एकही पोस्ट चीनच्या ताब्यात नाही. भारताच्या २० शहीद जवानांनी धडा शिकवून बलिदान दिले असे विधान केले होते.
COMMENTS