गौतम नवलखा यांचा जामीन फेटाळला

गौतम नवलखा यांचा जामीन फेटाळला

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. नवलखा यांना जामीन द्यावा असे काही सबळ कारण दिसत नाही, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी मत व्यक्त केले.

नवलखा यांचा जामीन अर्ज गेल्या वर्षी १२ जुलै रोजी एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. त्याला आव्हान देणारी याचिका नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने नवलखा यांच्या याचिकेवरचा निकाल राखून ठेवला होता.

नवलखा व अन्य आरोपी आनंद तेलतुंबडे याच्यावर आरोपपत्र दाखल करायचे असल्याने ९० ते १८० दिवसांचा कालावधी द्यावा अशी विनंती एनआयएने उच्च न्यायालयाला केली होती.

मूळ बातमी

COMMENTS