‘भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास सरकारची हरकत नाही’

‘भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास सरकारची हरकत नाही’

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करण्यास आमची काही हरकत नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या मह

भीमा-कोरेगाव, जज लोया आणि भिडे-सनातन
पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार
भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करण्यास आमची काही हरकत नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तडकाफडकी भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्याच्या पोलिसांकडून काढून घेऊन स्वत:कडे घेतला होता. त्यावर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आक्षेप घेतला होता व टीकाही केली होती.

पण गुरुवारी अतिरिक्त गृहसचिव संजय कुमार यांनी पीटीआयला सांगितले, की राज्याच्या गृहखात्याने भीमा –कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएने घेतल्यास आमची काही हरकत नाही असे कळवले आहे.

गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला तपास करण्याचा अधिकार असतो पण त्या आधी राज्य सरकारशी चर्चा केली पाहिजे व त्यांना विश्वासात घेतले पाहिजे असे विधान केले होते. तर काही दिवसांपूर्वी पुण्यातील सेशन कोर्टात एनआयएने एक अर्ज दाखल करून भीमा-कोरेगाव प्रकरणातील पुराव्याची सर्व कागदपत्रे पुणे पोलिसांनी मुंबईतील एनआयए कोर्टाकडे द्यावीत अशी विनंती केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0