या वर्षात एड्स, मलेरियापेक्षा कोविडचे मृत्यू अधिक

या वर्षात एड्स, मलेरियापेक्षा कोविडचे मृत्यू अधिक

जग नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना ओमायक्रॉनचे सावट अद्याप आपल्या सर्वांवर कायम आहे. गेल्या रविवारी एकट्या अमेरिकेत कोविडच्या नव्या २,८८,००० रुग

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविद-१९’
देशात कोरोनाचे २८ रुग्ण, २८ हजारांवर देखरेख
साथीचे रोग प्रतिबंध कायदा कसा अस्तित्वात आला…

जग नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना ओमायक्रॉनचे सावट अद्याप आपल्या सर्वांवर कायम आहे. गेल्या रविवारी एकट्या अमेरिकेत कोविडच्या नव्या २,८८,००० रुग्णांची नोंद झाली. ही नोंद कोविड महासाथ सुरू झाल्यानंतरची दुसरी सर्वाधिक नोंद आहे.

सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस घेब्रेयसिस यांनी नववर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. आपणा सर्वांना मित्र, नातेवाईक, कुटुंबियांसोबत नववर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा असली तरी कोविड महासाथीतून आपण बाहेर पडलेले नाही आहोत. त्यामुळे आपला जीव गमावण्यापेक्षा आयोजित कार्यक्रम रद्द केलेले परवडतील, असे विधान त्यांनी केले. नववर्षाचे कार्यक्रम रद्द करणेच या घडीला सर्वांच्या हिताचे आहे, असे कार्यक्रम नंतर साजरे करता येऊ शकतात, असेही डॉ. टेड्रोस घेब्रेयसिस म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी कोविड-१९ संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार या वर्षी २१ डिसेंबरपर्यंत जगभरात कोविड-१९मुळे ३ लाख ४५ हजार जणांचे मृत्यू झाले असून ही संख्या गेल्या वर्षी एचआयव्ही/एड्स, क्षय व मलेरियामुळे मरण पावलेल्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक आहे. मृतांच्या या आकडेवारीत कोविड रुग्णांना आरोग्य सेवा वेळेवर न मिळाल्याने त्यांचा झालेला मृत्यू व अन्य कारणे यांचा समावेश नाही.

डॉ. टेड्रोस घेब्रेयसिस यांनी संपूर्ण जागतिक समुदायाला लसवितरणातील विषमतेसंदर्भात विचार करावा अशीही विनंती केली आहे. कोविड-१९ प्रतिबंधित लस प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळणे गरजेचे आहे. येणार्या वर्षांत आपण ही महासाथ रोखायची असेल तर २०२२ वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील लसीकरण ७० टक्क्यापेक्षा अधिक होणे गरजेचे असल्याचे डॉ. टेड्रोस घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0