राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला; निकाल २१ जुलै रोजी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला; निकाल २१ जुलै रोजी

नवी दिल्लीः सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाल येत्या २४ जुलै रोजी संपत असून गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्या राष्ट्रपतीपदासाठीच्

कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर
अमित शहांच्या सभेत ‘गोली मारों..’च्या घोषणा
बोरिस जॉन्सन

नवी दिल्लीः सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाल येत्या २४ जुलै रोजी संपत असून गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांसाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेला मतदान होईल आणि २१ जुलैला मतगणना होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज भरायचा आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच देशातल्या सर्व राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य मतदानास पात्र असतात. यात दिल्ली व पाँडिचेरी विधानसभेतील सदस्यही मतदानास पात्र असतात. मात्र या निवडणुकांत राज्यपाल वा राष्ट्रपती नियुक्त सदस्य मतदानास पात्र नसतात. त्याच बरोबर ज्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत तेथील सदस्यही या निवडणुकांत मत देऊ शकत नाहीत.

या निवडणुकात राजकीय पक्ष आपल्या निर्वाचित खासदारांना व्हीप काढू शकत नाहीत.

राष्ट्रपती निवडणुकांचे मतदान संसद व प्रत्येक राज्यांच्या विधानसभेत घेतले जाते.

देशात सध्या संसदेचे ७७६ खासदार असून ४०३३ आमदार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0