देशी गायींची ‘काऊ पॅथी’ विकसित करण्यासाठी प्रस्ताव मागवले

देशी गायींची ‘काऊ पॅथी’ विकसित करण्यासाठी प्रस्ताव मागवले

नवी दिल्ली : काही सरकारी विज्ञान संशोधक खात्यांच्या पैशातून देशी गायींवर संशोधन व विकास करण्यासाठी केंद्र सरकारने एक कार्यक्रम आखला असून त्यावर काम कर

उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीचा राजकीय फायद्यासाठी वापर
याला गोरक्षण म्हणायचे?
गुजरात : गोशाळेत कोविड सेंटर; गोमूत्राचा उपचार

नवी दिल्ली : काही सरकारी विज्ञान संशोधक खात्यांच्या पैशातून देशी गायींवर संशोधन व विकास करण्यासाठी केंद्र सरकारने एक कार्यक्रम आखला असून त्यावर काम करण्यासाठी सरकारने प्रस्ताव मागितले आहेत. या कार्यक्रमाचे नाव सायंटिफीक युटीलायझेशन थ्रू रिसर्च ऑग्युमेंटेशन प्राइम प्रॉडक्ट्स फ्रॉम इंडिजीनियस कॉऊज (सूत्र पीक) ( Scientific Utilisation Through Research Augmentation-Prime Products from Indigenous Cows) ( SUTRA PIC) असे असून हा कार्यक्रम विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून सुरू केला जाणार असल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे.

या कार्यक्रमासाठी बायोटेक्नॉलॉजी विभाग, सीएसआयआर, आयुष, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या चार महत्त्वाच्या विभागांचे  सहकार्य मिळणार आहे. हे विभाग नक्की किती आर्थिक निधी देणार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

केंद्र सरकारपुरस्कृत या कार्यक्रमात देशी गायींचे वैशिष्ट्य, औषध व आरोग्यासाठी देशी गायींची मदत, देशी गायींचा शेतीसाठीचा उपयोग, अन्न, पौष्टिक आहार व अन्य उपयोगासाठी गायींची होणारी मदत अशा बाबींवर संशोधनाची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला देशी गायींपासून मिळणाऱ्या दुधावर, दह्यावर व अन्य दुग्धनिर्मित पदार्थांवर संशोधन त्याचबरोबर देशी गायींकडून मिळणाऱ्या दुधाचे व अन्य दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाणीकरण अपेक्षित आहे. सरकारी पत्रकात याला ‘काऊपथी’ असे संबोधण्यात आले आहे. आयुर्वेदात गायीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे उपयोग सांगण्यात आले आहेत, तशीच ‘काऊपथी’ विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0