गहू, हरभरा, मसूर, मोहरीच्या हमीभावात वाढ

गहू, हरभरा, मसूर, मोहरीच्या हमीभावात वाढ

नवी दिल्लीः केंद्र सरकारने सोमवारी सहा रब्बी पिकांचे हमीभाव ६ टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला. रविवारी शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२० आणि शेतमाल हमी भाव करार व शेती सेवा (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० ही दोन वादग्रस्त विधेयके राज्यसभेत प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. त्यानंतर सरकारने लगेचच रब्बी पिकांचे हमीभाव वाढवण्याचा निर्णय घेतला.

गव्हाचा हमीभाव ५० रु.नी वाढवून तो प्रतिक्विंटल १,९७५ रु. इतका निश्चित केला असून हरभराचा हमीभाव २२५ रु.ने वाढवून तो ५,१०० रु. प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. त्याचबरोबर बार्लीचा हमीभाव ७५ रु.ने वाढवून १,६०० रु., मसूरचा ३०० रु.ने वाढवून ५,१०० रु., मोहरीचा २२५ रु.ने वाढवून ४,६५० रु. तर करडईचा हमीभाव ११२ रु.ने वाढवून ५,३७ रु. प्रतिक्विंटल इतका केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS