तामिळनाडूत पीएम किसान योजनेत ११० कोटींचा घोटाळा

तामिळनाडूत पीएम किसान योजनेत ११० कोटींचा घोटाळा

नवी दिल्लीः तामिळनाडूमध्ये पीएम किसान योजनेत ११० कोटी रु.चा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून या घोटाळ्यात सरकारी अधिकारी व स्थानिक पातळीवरील नेत्यांनी

लॉकडाऊन आणि दुग्ध व्यावसायिक शेतकरी
सोयाबीन पिकाच्या संकटास जबाबदार कोण?
खत टंचाईमध्ये जायबंदी शेतकरी

नवी दिल्लीः तामिळनाडूमध्ये पीएम किसान योजनेत ११० कोटी रु.चा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून या घोटाळ्यात सरकारी अधिकारी व स्थानिक पातळीवरील नेत्यांनी पैशांची लूट केल्याचे निदर्शनास आले आहे. या ११० कोटी रु. राज्यातील १३ जिल्ह्यातील साडेपाच लाख गरजू शेतकर्यांना फायदा झाला असता. घोटाळा करणार्यांनी लाभार्थ्यांच्या यादीत बनावट नावे घुसडल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात काही निर्बंध शिथिल केल्यानंतर हा घोटाळा करण्यात आला, असेही दिसून आले आहे.

दरम्यान या प्रकरणात १८ एजंटना ताब्यात घेतले असून या योजनेशी निगडित असलेले ८० अधिकार्यांचे निलंबित तसेच प्रशासनातील ३४ अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबित अधिकार्यांमध्ये राज्याच्या कृषी खात्यातील तीन सहाय्यक संचालक आहेत.

११० कोटी. रु.च्या घोटाळ्यातील ३२ कोटी रु.ची वसुली झाली असून अन्य पैसे येत्या ४० दिवसात मिळतील, असे तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे.

हा घोटाळा राज्यातील कल्लाकुरिची, विल्लुपुरम, कुड्डालोर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, रानीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णगिरी व चेंगलपेट जिल्ह्यात झाला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सालेम जिल्ह्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळली असल्याचा आरोप द्रमुकचे नेते स्टालिन यांनी केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0