‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ : गुजरातमध्ये वक्तृत्व स्पर्धा

‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ : गुजरातमध्ये वक्तृत्व स्पर्धा

नवी दिल्लीः गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या प्रकरणी नीताबेन गवळी या शिक्षण विकास अधिकाऱ

भारतीय रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा प्रणेता
तालिबानची संयुक्त राष्ट्रांकडे मान्यतेची मागणी
श्रीलंकाः आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने

नवी दिल्लीः गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या प्रकरणी नीताबेन गवळी या शिक्षण विकास अधिकाऱ्याला राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले आहे.

गुजरात सरकारच्या युवक सेवा व सांस्कृतिक खात्याने बाल प्रतिभा शोध स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत वक्तृत्व व अन्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा वलसाड जिल्ह्यातल्या कुसुम विद्यालयात झाली. ही स्पर्धा ५ वी ते ८ वी वर्गांसाठी होती. त्यात २५ सरकारी शाळा व खासगी शाळांनी भाग घेतला होता. १४ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, या स्पर्धेत नथुराम गोडसेचा विषय आमच्या शाळेने घेतला नाही असा खुलासा कुसुम विद्यालयाने केला आहे. आम्ही फक्त वक्तृत्व स्पर्धेसाठी आमच्या शाळेचा हॉल देऊ केला होता. या स्पर्धेत आमच्या शाळेचे विद्यार्थी व अद्यापक वर्गाने भाग घेतलेला नव्हता असा दावा कुसुम विद्यालयाने केला आहे. पण व्हाइब्ज ऑफ इंडियाने एक वृत्त प्रसिद्ध केले असून या वृत्तात अन्य स्पर्धांतला एक विजेता विद्यार्थी कुसुम विद्यालयाचा असल्याचे म्हटले आहे.

नथुराम गोडसे या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी नाराजी व आश्चर्य व्यक्त केले होते. या नाराजीनंतर स्पर्धा आयोजकांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या मुलाकडून बक्षीस पुन्हा मागितले.

या घटनेनंतर विजेता विद्यार्थ्याने आपण ‘नथुराम गोडसे आपला आदर्श आहे’, या विषयावर खूप मेहनत घेतली होती असे सांगितले. माझ्या शिक्षकांनी या विषयाची माझ्याकडून तयारी करून घेतली होती. असा पुरस्कार परत मागणे योग्य नसल्याचे या विद्यार्थ्याचे म्हणणे होते. पुरस्कार परत देताना या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणीही आले होते.

या मुलाला उत्कृष्ट वक्तृत्व शैली, विषयाचे चांगले ज्ञान व उत्तम मांडणी याबद्दलही गौरवण्यात आले होते. या मुलाचे भाषण संपल्यानंतर उपस्थित पालकांनी टाळ्या वाजून त्याचे अभिनंदन केले होते.

या वक्तृत्व स्पर्धेत नथुराम गोडसे हा विषय नंतर समाविष्ट करून घेण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे. तो निर्णय नीताबेन गवळी यांचा होता. या स्पर्धेत, ‘मला पक्षी होऊन आकाशात संचार करायचा आहे’, आणि ‘मी शास्त्रज्ञ होईन पण अमेरिकेला जाणार नाही’, असे दोन अन्य विषय होते.

पण वलसाड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी. डी. बाराईया यांनी अशी स्पर्धा आहे, याची मला कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0