अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगलप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने पालनपूर तुरुंगात स्थानांतरण
अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगलप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने पालनपूर तुरुंगात स्थानांतरणीय वॉरंट दाखवत अटक करण्यात आली. गुजरात दंगलीचे कारस्थान रचल्याचा आरोप करत तत्कालिन पोलिस अधिकारी असलेल्या संजीव भट्ट यांनी अनेक निरपराध व्यक्तींना अटक केली होती असा त्यांच्यावर आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार तिस्ता सेटलवाड व गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक आरबी श्रीकुमार यांना गुजरात दंगलीत निरपराधांना गोवण्याचे आरोप लावत अटक केली होती. आता संजीव भट्ट हे या प्रकरणातील तिसरे आरोपी आहेत.
गेली कित्येक वर्षे तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार व संजीव भट्ट हे तिघे जण गुजरात दंगलीमागे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकार कारणीभूत असून या सरकारने दंगल शमवली नाही असे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य काही जणांना गुजरात दंगलीत क्लिनचीट देण्याच्या गुजरात हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड व श्रीकुमार यांच्यावर केलेल्या टिप्पण्णीनंतर दोघांना अटक करण्यात आली होती.
सध्या संजीव भट्ट एका वकिलाला फसवल्याच्या २७ वर्षे जुन्या खटल्यात बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर तुरुंगात २०१८पासून कैद आहेत. या खटल्याव्यतिरिक्त जामनगर येथे पोलिस कोठडीतील एका मृत्यू प्रकरणी त्यांना जन्मठेपही झाली आहे.
मूळ वृत्त
COMMENTS