शिवलिंग सापडल्याचा दावा; ज्ञानवापी मशिदीतील तलाव सील

शिवलिंग सापडल्याचा दावा; ज्ञानवापी मशिदीतील तलाव सील

वाराणसीः शहरातील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सोमवारी झाल्यानंतर या मशिदीच्या परिसरातल्या एका तलावात शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षकारांनी दावा केल्यानं

इशरत जहाँ प्रकरणः तपास अधिकाऱ्याच्या बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती
कफील खान यांच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाकडून समर्थन
भारतबंदला काही राज्यांमध्ये यश

वाराणसीः शहरातील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सोमवारी झाल्यानंतर या मशिदीच्या परिसरातल्या एका तलावात शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षकारांनी दावा केल्यानंतर हा तलाव सील करण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले. मंगळवारी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सोमवारी तीन दिवस सुरू असलेले ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पुरे झाले. या मशिदीच्या वरच्या भागात नमाज प्रार्थना होत असते. तेथील एका तलावात शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षकारांनी दावा केला व त्यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागत याला संरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने जिथे शिवलिंग सापडले आहे, त्या भागाला सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देत या परिसरात कोणालाही प्रवेश देण्यास मनाई केली आहे.

हिंदू याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी सांगितले की, मशिदीतील तलावात शिवलिंग सापडल्याचा दावा काहींनी केला. ही माहिती आम्ही सांगितल्याने न्यायालयाचा कोणताही अवमान झाला नाही. पुराव्यात कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून आम्ही तलावाला सील केले जावे अशी मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली. या संदर्भात मुस्लिम पक्षकार न्यायालयात जाऊन त्यांचे म्हणणे मांडू शकतात, असे चतुर्वेदी म्हणाले.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0