सामाजिक अशांतता आणि बेकारी किंवा अर्धबेकारी यांच्यातील संबंध हा नवीन अहवालाचा महत्त्वाचा भाग आहे.
जगभरात ४७ कोटींपेक्षा जास्त लोक सध्या बेकार किंवा अर्धबेकार आहेत असे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) तयार केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार जगभरातील बेकारीचा दर २०१० च्या दशकात तुलनेने स्थिर राहिला. मात्र २०२० मध्ये जागतिक बेकारांच्या संख्येमध्ये १८.८ कोटी ते १९.०५ कोटी अशी २५ लाखांची भर पडेल अशी अपेक्षा आहे.
“कोट्यवधी काम करणाऱ्या लोकांसाठी काम करून चांगले आयुष्य घडवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे,” असे ILO प्रमुख गाय रायडर यांनी जिनीव्हा येथे पत्रकारांना सांगितले.
‘जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन’ या वार्षिक अहवालामध्ये फक्त बेकारच नाहीत तर अर्धबेकारांच्या मुद्द्यावरही भर देण्यात आला. जगभरात सुमारे २८.५ कोटी लोक अर्धबेकार मानले जात आहेत. याचा अर्थ असा, की त्यांना इच्छा आहे तितके काम त्यांना मिळत नाही, त्यांनी कामाचा शोध घेणे सोडून दिले आहे किंवा अन्य कारणांमुळे श्रम बाजारामध्ये त्यांना प्रवेश नाही.
४७ की हा आकडा जगभरातील श्रम शक्तीच्या १३% आहे असे अहवालात म्हटले आहे.
सामाजिक अशांततेचा बेकारीच्या दराशी संबंध आहे का?
सामाजिक अशांतता आणि बेकारी किंवा अर्धबेकारी यांच्यातील संबंध हा नवीन अहवालाचा महत्त्वाचा भाग आहे.
“आपल्या अनेक समाजांमध्ये सामाजिक सलोखा संपुष्टात येत चालला आहे त्यामध्ये श्रम बाजारातील परिस्थिती हेही एक कारण आहे,” असे लेबॅनन आणि चिलीमधील जन आंदोलनांचा संदर्भ देतरायडर म्हणाले.
ILO चा “सामाजिक अशांतता निदेशांक” निदर्शने आणि संप यासारख्या गोष्टींची वारंवारता मोजतो. या निदेशांकानुसार जागतिक पातळीवर तसेच ११ प्रदेशांपैकी ७ मध्ये २००९ ते २०१९ या काळात सामाजिक अशांततेमध्ये वाढ झाली आहे.
१५ ते २४ वर्षे वयोगटातील २६.७ कोटी तरुणांना नोकरी नाही. शिक्षण किंवा प्रशिक्षण नसल्याचा यामध्ये मोठा हात असू शकतो. नोकरीवर असलेल्या अनेक तरुण लोकांना कामाच्या ठिकाणच्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.
अहवालामध्ये जगातील सर्वोच्च उत्पन्न मिळवणारे आणि सर्वात कमी उत्पन्न मिळवणारे यांच्यातील प्रचंड विषमतेचाही पुनरुच्चार करण्यात आला आहे. कार्यबळामध्ये स्त्रियांचा सहभाग ४७% आहे, जो पुरुषांच्या तुलनेत २७ परसेंट पॉइंट कमी आहे.
“आपल्याला जिथे जायचे आहे तिकडे आपण जात नाही आहोत,” रायडर म्हणाले. “आधी वाटले होते त्यापेक्षा परिस्थिती वाईट आहे.”
COMMENTS