हरिद्वार कुंभ मेळ्यात १००० कोरोना रुग्ण आढळले

हरिद्वार कुंभ मेळ्यात १००० कोरोना रुग्ण आढळले

हरिद्वार/डेहराडूनः देशभर कोरोना संसर्गाचा लाट आली असताना कुंभ मेळा मोठ्या उत्सवात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाला असून आज नवे ४०८ कोरोना पॉझिटि

पारंपरिक मच्छिमार : मत्स्य दुष्काळ, सीआरझेड व कोरोना
जगभरात कोरोना मृत्यूंची आकडेवारी ५० लाखाच्या पुढे
आठवड्यात १५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

हरिद्वार/डेहराडूनः देशभर कोरोना संसर्गाचा लाट आली असताना कुंभ मेळा मोठ्या उत्सवात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाला असून आज नवे ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सोमवारी येथे ५९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.

सोमवारच्या दुसर्या शाही स्नानात २८ लाख भाविक आले होते. हरिद्वार रेल्वे स्थानक ते हर की पौडी व अन्य नदी घाटांच्या सुमारे १० किमी परिसरात कुठेही थर्मल स्क्रीनिंग नव्हते. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे मास्क न घालणार्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले गेले व त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांकडून झालेली नाही.

प्रशासनाने रविवारी साडे अकरा ते सोमवार संध्याकाळपर्यंत १८,१६९ भाविकांची कोरोना चाचणी केली असता त्यात ४०८ कोरोना रुग्ण आढळून आले.

कुंभ मेळ्यात येण्या अगोदर भाविकांना आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट अनिवार्य आहे. त्या तपासण्यासाठी विविध ५० चेकपोस्टवर भाविकांकडून रिपोर्ट मागवण्यात येत होते. पण काही भाविकांकडे रिपोर्ट नव्हता तरीही त्यांना सोडण्यात आल्याचे इंडियन एक्स्प्रेसचे वृत्त आहे.

म. प्रदेशात भिंड येथे राहणारे सरकारी शिक्षक राजप्रताप सिंह आपल्या कारने सोमवारी हरिद्वारला पोहचले. त्यांना उ. प्रदेशच्या सीमेवर नारसन येथे आरटी-पीसीआर रिपोर्ट पोलिसांनी पाहिले पण नंतर मेळा असलेल्या ठिकाणी कुठेही रिपोर्ट तपासले नाहीत, असे सिंह यांनी सांगितले.

जम्मूहून प्रमोद शर्मा रेल्वेने हरिद्वारला आले. त्यांच्याकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नव्हता. त्यांनी सांगितले की, अनेक भाविकांना हरिद्वारच्या आधी ३ किमी ज्वालापूर रेल्वे स्थानकावर उतरण्यास सांगण्यात येत होते. तेथेही कुणी रिपोर्ट तपासला नाही. आम्ही थेट गंगा स्नान करायला गेलो व तेथेही कुणी थर्मल स्क्रीनिंग केले नाही.

कुंभ मेळ्याचे कोविड प्रमुख डॉ. अविनाश खन्ना यांनी सांगितले की, रेल्वे स्थानक, राज्यांच्या सीमा व नदी घाट क्षेत्रात थर्मल स्क्रीनिंग व रॅपिड अँटिजीन टेस्ट केल्या जात असून सोमवारी सकाळी घाट आखाड्यांसाठी आरक्षित करण्यात आला होता, त्यामुळे तेथे टेस्ट व स्क्रीनिंग करण्यात आले नाही. अखाड्यांचे स्नान झाल्यानंतर येथे कोविड चाचण्या सुरू होतील, असे खन्ना यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0