तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतात महागाईः आयएमएफ

तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतात महागाईः आयएमएफ

वॉशिंग्टनः युक्रेन-रशियातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेलबाजारातील इंधन किमती वाढल्या त्या परिणामी भारतात महागाई वाढल्याचे मत आयएमएफचे आशिया व प्रशांत

माध्यमांनी चुकीचे वार्तांकन केल्याचा सरन्यायाधीशांचा आरोप
रंगीबेरंगी आठवले
सर्व प्रश्नांचे मूळ जेव्हा गांधी घराणे असते तेव्हा..

वॉशिंग्टनः युक्रेन-रशियातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेलबाजारातील इंधन किमती वाढल्या त्या परिणामी भारतात महागाई वाढल्याचे मत आयएमएफचे आशिया व प्रशांत विभागाचे कार्यवाहक संचालक एनी-मेरी गुल्डे वुल्फ यांनी व्यक्त केले. भारतातील महागाई रोखण्यासाठी आर्थिक संरचनेत मूलभूत बदल गरजेचे असून काही क़डक आर्थिक निर्णय सरकारला घ्यावे लागतील असे वुल्फ यांनी सांगितले.

२०२२-२३ या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ८.२ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हा विकास दर कायम ठेवायचा असेल तर अर्थव्यवस्थेच्या रचनेत मूलभूत बदल करणे गरजेचे आहे. कामगार, जमीन व शैक्षणिक क्षेत्रात अधिक सुधारणांवर भर द्यावा लागणार आहे. महिलांच्या श्रमाला उत्तेजन देण्याची गरज आहे. समाजातील कमकुवत घटकाला सरकारी मदतीची आवश्यकता असून त्यासाठी अर्थव्यवस्थेच्या मुळाशी जावे लागेल. सध्या युक्रेन-रशिया युद्धामुळे तेलाची आयात महाग झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था तेलआयात व अन्य वस्तूंवर अवलंबून आहे, त्याने महागाई वाढल्याचे वुल्फ यांचे म्हणणे आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0