भाजपेतर राज्यांच्या धोरणामुळे इंधन दरवाढीचा बोजा – मोदी

भाजपेतर राज्यांच्या धोरणामुळे इंधन दरवाढीचा बोजा – मोदी

नवी दिल्लीः भाजपेतर राज्यांनी कर्नाटक, गुजरातसारखा इंधनावरील व्हॅट कमी करावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना करत विरोधी पक्षांवर इंधन दरवाढीचा आर

राजस्थान : काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
‘दीदी ओ दीदी’
फेसबुकची भाजपवर मेहरनजर – ‘वॉल स्ट्रीट’चे वृत्त

नवी दिल्लीः भाजपेतर राज्यांनी कर्नाटक, गुजरातसारखा इंधनावरील व्हॅट कमी करावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना करत विरोधी पक्षांवर इंधन दरवाढीचा आरोप केला आहे. बुधवारी मोदींनी देशातील कोविड-१९ परिस्थिती पाहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवर चर्चाही झाली. या चर्चेत मोदींनी कर्नाटक व गुजरात राज्यांनी इंधनावरील आपला व्हॅट कमी करून जनतेच्या खिशावर पडणारा भूर्दंड कमी केल्याचा दावा केला. महाराष्ट्र, प. बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तमिळनाडू या भाजपेतर राज्यांनी केंद्राने सूचवलेल्या सूचना मान्य केल्या नाही. त्यामुळे तेथील नागरिकांवर इंधन दरवाढीचा बोजा पडला आहे. आम्ही नोव्हेंबरमध्येच व्हॅट कमी करण्यासाठी सांगत होतो आता तरी या राज्यांनी कर्नाटक व गुजरातप्रमाणे आपला व्हॅट कमी करावा व नागरिकांवरील बोजा कमी करावा असे मोदी म्हणाले. व्हॅट कमी केल्याने राज्यांचे आर्थिक नुकसान होत असते असेही मोदी म्हणाले. युक्रेन युद्धामुळेही इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला. रोज समस्या, अडचणी वाढत गेल्या. हे जागतिक संकट आहे, अशा परिस्थिती केंद्र व राज्यांनी एकमेकांशी संवाद साधून मार्ग काढला पाहिजे असे मोदी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची केंद्रावर टीका

पंतप्रधानांच्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली. संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. तरीही महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0