महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक

मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना 

डॉ. सिंग यांना उत्तर म्हणून हर्षवर्धन काँग्रेसवर बरसले
उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी
‘भारताला मदत करण्यात जगाला आलं अपयश’

मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना  लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: